काटेमाट

शास्त्रीय नाव : Amaranthus viridis

स्थानिक नाव : काटेमाट

औषधी गुणधर्म

  • काटेमाठाची भाजी पौष्टिक आणि पचनास हलकी असल्याने पाचनक्रिया सुधारते.
  • बाळंतिणीच्या जेवणात ही वाढणयास मदत होते.
  • गर्भापातहोण्याचे टाळते आणि गर्भाचे नीट पोषण होते.
  • गर्भाशय शैथिल्य, सुज यावरही काटेमाठाची भाजी उपयुक्त
  • पित्त, रक्तविकार, मूळव्याध, या विकारांवर काटेमाठ गुणकारी.

काटेमाटची भाजी

साहित्य
काटेमाट, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर.

कृती

  • एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व खुडलेली भाजी उकळुन घ्यावे.
  • नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.
  • एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन घ्यावे.
  • बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरा, तिखट, मीठ, हळद, टॉमेटो तळून घ्यावे.
  • त्यामध्ये भाजी टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे.
  • अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *