पुणे : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील एस. एम. चैतन्य स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित, सत्यशिलदादा शेरकर मित्र परिवार, केरूशेठ वेठेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सर्वोदय परिवार व बंटी फुड्स प्रॉडक्ट्स प्रायोजित राज्यस्तरीय शूटींग बॉल (shooting ball )स्पर्धेत आमदार अतुलदादा बेनके युवा मंच (आय एस सी मालेगाव) संघाने विजेतेपद पटकाविले. तर सत्यशीलदादा शेरकर मित्र परिवार (जामनेर) हा संघ उपविजेता ठरला.

स्पर्धेमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असणाऱ्या २४ संघानी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर केशवराव घोळवे यांच्या हस्ते झाले. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे गटनेते शरदशेठ लेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथशेठ लेंडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहूलशेठ जाधव, धनंजय डुंबरे, सरपंच सुरेखाताई वेठेकर, माजी उपसरपंच किसन कुटे, जयसिंग जाधव सर, प्रफुल्ल इथापे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. असोसिएशनतर्फे देण्यात येणारा ‘चैतन्य पुरस्कार’ प्रगतशिल शेतकरी शिवाजीशेठ वेठेकर, सामाजिक कार्यकर्ते भिवरामदादा डोके यांना प्रदान करण्यात आला. माजी उपप्रचार्य दत्तात्रय जाधव यांचा सेवापुर्ती सन्मान करण्यात आला.  

स्पर्धेमधील विजयी संघांना सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन रामदासशेठ वेठेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. माजी सरपंच रोहिदास वेठेकर, सोशल युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष विमलेश शेठ गांधी, धर्मा जाधव, जितेंद्र जाधव, रोहित खर्गे, जनार्दन कुटे, दत्ता वेठेकर, विठ्ठल दुरगुडे, जयसिंग पोटे, मोसीम सय्यद यावेळी उपस्थित होते.

स्पर्धेत स्पर्धा नियंत्रक म्हणून राष्ट्रीय पंच नंदकुमार भोईटे, पंच म्हणून के. डी. वाघमारे, राजेश सोडळ, राजेंद्र तांबे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक रघुनाथ चव्हाण यांनी तर सुत्रसंचालन अरविंद कुटे यांनी, समालोचन राशिद अन्सारी यांनी केले. स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष केशव पठारे यांनी आभार मानले. गुणलेखक म्हणून संदिप देवगिरे, अविनाश जाधव, हरी जाधव, सचिन वेठेकर यांनी तर रेषा पंच गोविंद चव्हाण, जावेद मोमीन, ऋषी मिंढे, विजय थिटे, शिवम कुटे, रोहित गाडेकर, विनू कुटे, अस्लम मोमीन यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वसंत शेटे, गोरक्ष वाकचौरे, सलाम शेख, अतुल पडवळ, गौरव कदम, शिवम वाकचौरे, मुस्तकीम मोमीन यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक : आमदार अतुलदादा बेनके युवा मंच(आय एस सी मालेगाव)  
द्वितीय क्रमांक : सत्यशीलदादा शेरकर मित्र परिवार (जामनेर)
तृतीय क्रमांक : केरूशेठ वेठेकर प्रतिष्ठान ( युथ फाउंडेशन मनेराजुरी)
चतुर्थ क्रमांक : सर्वोदय ग्रुप ( इस्तीयाक मालेगाव)
पाचवा क्रमांक : बंटी फूड्स प्रॉडक्ट (औरंगाबाद जिल्हा)
सहावा क्रमांक : सांगली शहर
सातवा क्रमांक : जयंत घोरपडे, टेंभुर्णी.
आठवा क्रमांक : राशीद मालेगाव.

वैयक्तिक बक्षिसे : उत्कृष्ट शूटर – शोएब शेख (जामनेर), उत्कृष्ट स्कूपर – मुजक्कीर अन्सारी (मालेगाव), उत्कृष्ट नेटमन – अक्षय पवार (मनेराजुरी), उत्कृष्ट सर्व्हिसमन – इस्तीयाक अन्सारी (मालेगाव).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *