चिवळ

शास्त्रीय नाव : Portutaca qudrifida
उपयुक्त भाग : पाने

औषधी गुणधर्म

  • चिवळीची भाजी शितल असून रक्तशुध्दीकरणारी आहे.
  • रक्तपित्तात ही भाजी लाभदायी.
  • या भाजीच्या सेवनामुळे उष्णता कमी होऊन लघवीला साफ होते.
  • भाजीत कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म झाले आहेत.
  • चिवळीची भाजी मूळव्याधीवर गुणकारी

चिवळ भाजी

साहित्य
चिवळ भाजी, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरे, तिखट, मीठ, हिंग, हळद, टोमॅटो, कोथींबीर.

कृती

  • चिवळीची भाजी नीट निवडून घ्या. अगदी पानं पानं घ्यायची गरज नाही. मुळं काढून टाका फक्त कोवळे देठ घ्यावे.
  • ही भाजी स्वच्छ धुतल्यावर जराशी कोरडी करुन बारीक चिरून घ्या.
  • कढईत तेलाची फोडणी करा. त्यात हिंग घाला. त्यावर कांदा घालुन मध्यम आचेवर कांदा चांगला मऊ होईपर्यंत शिजु द्या.
  • कांदा शिजत आला की लसून-मिरचीचं वाटण घालुन परतून घ्या.
  • खमंग वास आल्यावर हळद आणि मुगडाळ घाला आणि त्यावर भाजी घाला. नीट हलवून घ्या.
  • त्यात तिखट आणि मिठ घाला. परत हलवून घ्या आणि झाकण ठेवून भाजी शिजवा.
  • मुगडाळ हलकी शिजवा फार गाळ करु नका.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *