दिंडा

शास्त्रीय नाव : Leea macrophylla
स्थानिक नाव : ढोलसमुद्रिका
कुळ : Leeaceae
आढळ : ही प्रजात पश्चिम घाट कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागातील जंगलात आढळते.

औषधी गुणधर्म

 • व्रणरोपक म्हणुन दिंडा ही वनस्पती प्रसिध्द आहे.
 • औषधात दिंडयाचे मुळ वापरतात.
 • वनस्पतीत ग्राही , वेदनास्थापन आणि रक्तस्कंदन हे इतर औषधी गुणधर्म आहेत.
 • कंदाचा लेप नायटयावरही प्रसिध्द आहे.

दिंड्याची भाजी

साहित्य
एक जुडी दिंडे, अर्धा वाटी मोड आलेले वाल, एक कांदा, सहा लसूण पाकळ्या, थोडासा गुळ, आमसुल/कोकम, दोन चमचे खिसलेले आले खोबरे, कोथिंबीर, फोडणीला मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, तेल.

कृती

 • दिंड्याचे देठ शेवग्याच्या शेंगाप्रमाणे दिसेपर्यंत सोला.
 • नंतर चिरुन धुऊन घ्या, तेल एका कढईत गरम करुन मोहरी, जिरे व हिंग टाका.
 • नंतर त्यात कांदा, लसुन टाका. गुलाबी झाल्यावर त्यात गरम मसाला व चिरलेली भाजी, मोड आलेले वाल टाका.
 • झाकण टाकून मंद आचेवर ठेवा. भाजी शिजल्यावर त्यात गुळ, कोकम, कोथिंबीर व ओले खोबरे, मीठ टाका.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

2 thought on “रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची”
 1. खूपच छान माहिती मिळाली आहे, धन्यवाद।
  अशीच पुस्तके उपलब्ध करून दिली तर मी नक्की घेईल

 2. आरोग्यासाठी खुप सुंदर माहिती, असेच लेखन नियमित करा , खूप खूप आभार आणि शुभेच्छा
  वसंत कुटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *