कुरडू

शास्त्रीय नाव : Celosia Argentina
उपयुक्त भाग : पाने, बिया

औषधी गुणधर्म

  • कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत.
  • तशीच त्याची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे.
  • कुरडूच्या पालेभाजीमुळे कफ कमी होतो. जुनाट विकारात कुरडूच्या पालेभाजीचा रस प्यावा.
  • कोवळ्या पानांचा रस किंवा जून पाने शिजवून त्याची भाजी खावी.
  • दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफविकार यात उपयुक्त आहे.

कुरडूची भाजी

साहित्य

कुरडू पाने, दोन कांदे, पाच लसुण पाकळ्या, तीन मिरच्या, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, एक टोमॅटो, पाव वाटी ओले खोबरे, चवी पुरते मीठ, अर्धा चमचा साखर, २ चमचे तेल इ.

कृती

  • भांड्यात तेल गरम करुन लसुण, मिरची फोडणीला टाकावी.
  • हिंग, हळद, कांदा घालुन जरा परतावे.
  • लगेच टोमॅटो आणि कुरडूची चिरलेली भाजी टाकावी.
  • मग झाकण ठेवून जरा शिजु द्यावे.
  • थोड्या वेळाने ढवळून त्यात मीठ, साखर घालावी.
  • परत ढवळून ३-४ मिनीटांनी ओले खोबरे घालावे.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *