दुर्गम प्रतिष्ठानकडून दिवाळी भेट सुपूर्द

पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासीयांप्रमाणे त्यांनाही हा दिपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी पुण्यातील ‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने कोंडकेवाडी (ता. पुरंदर) या दुर्गम गावातील ६५ आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ, एक महिन्याचा किराणा व नवीन कपडे असे साहित्य दिवाळी भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे कोंडकेवाडीत दिवाळी आधीच जल्लोष साजरा झाला.

‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने रविवारी (ता.१६) स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या पूरंदर किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या कोंडकेवाडी येथे जाऊन दिवाळी साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात आजी-आजोबांचे औक्षण करून त्यांना नवीन कपडे देण्यात आले.

गावातील ६५ कुटुंबांना साखर, तेल, पोहे, रवा, बेसनपीठ, तूप, कडधान्य, डाळी, साबण, चहा पावडर, मसाले आदी महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, ब्लॅंकेट, कानटोपी, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, साबण, पणती, उटणे, रांगोळी आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात केले. गावातील ९३ महिलांना साड्या, ८० मुलामुलींना, तसेच २८ ज्येष्ठ नागरिकांना नवीन कपडेही देण्यात आले.

‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेचे कार्याध्यक्ष प्रसाद खंडागळे, खजीनदार गणेश काळे, सहखजीनदार अमोल कुटे, सचिव स्वाती सेठ, सह सचिव श्रीकांत मोरे, सदस्य रविंद्र पठारे, ॲड. प्रमोद पवार, कविता शिंदे, संजय ऐलवाड, सुनिल जगताप, माधवी येलारपूरकर, निलेश जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.

कार्यक्रमासाठी सुरेश मांदळे, श्रीप्रसाद गिरी, विनायक अवसरे, वाल्मिक ढोरकुले, अमोल मुंडे, अमोल शुक्ला, संतोष पंडीत, मंगेश डाळिंबकर, प्रितेश केदारी, सुनील अमरनाणी, मनीष मुदकवी, अभय लुंकड, प्रशांत पेंडसे, अमित मोरे, प्रविण तांबेकर, अशोक जाधव, उल्हास कदम, अनिल शिंदे, ओंकार जाधव, निखील बिबवे, विनोद येलारपुरकर, विशाल नाळे, दीपक गवळी, नितीन शहा, सुरेश ढमढेरे, नवनाथ भुमकर, राजेंद्र बलकवडे, अरविंद मोरे, गुलाब निवंगुणे, शांताराम वाडेकर, मुकुंद डिंबळे, दिलीप थोरात, दिलीप शेजवळ, केतन पायगुडे, नामदेव घाडगे, पंकज गांधी, गणेश परदेशी, जगदिश बोथाटे, संजय दळवी, संतोष कसपटे, मनोहर शेलार, शिवाजी कुरे, सचिन झेंडे, जगदिश बोथाटे,

विनोद सरपोतदार, रमेश गाढवे, मंगेश खैर, महेश सोनी, कांतीलाल जैन, रवी तोलानी, मेडीवन मेडिकल्स, निलेश जोशी, सिद्धेश जाधव, स्वराज कोकाटे, प्रसाद गाढवे, आदित्य खोपडे, अरूण सोमवंशी, सुनील जाधव, संदीप कुलकर्णी, दिपक पोकळे, त्याच बरोबर महिला प्रतिनिधी रश्मी जाधव, उमा चिकणे, कविता शिंदे, सुनंदा मोरे, रोहिणी जाधव, अंजली वाळके, नीलम खंडागळे, भारती थोरवे, रूपा मेहता, जयश्री पाटील, अपर्णा शेठ, रेष्मा मोरे, पुनम देशमुख, कविता खळदकर, स्वाती वाडेकर, राजश्री गांधी, श्रृती जाधव, ओवी येलारपूरकर, समृद्धी सेठ आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *