पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) : येथील एस. एम. चैतन्य स्पोर्टस् असोसिएशनतर्फे आयोजित, केरूशेठ वेठेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान, राहुलदादा जाधव युवा मंच व बंटी फुड्स प्रॉडक्ट्स प्रायोजित “आमदार चषक” अखिल भारतीय शूटींग बॉल स्पर्धेत आमदार अतुलशेठ बेनके युवा मंच (आय. एस. सी. मालेगाव) संघाने विजेतेपद पटकाविले. तर केरूशेठ वेठेकर प्रतिष्ठान (जामनेर) हा संघ उपविजेता ठरला.

स्पर्धेमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असणाऱ्या २० संघानी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके यांच्या हस्ते झाले. शिवसेना नेते मंगेशअण्णा काकडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहूलशेठ जाधव, सरपंच सुरेखाताई वेठेकर, उपसरपंच अमोल वंडेकर, माजी उपसरपंच किसन कुटे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. असोसिएशनतर्फे देण्यात येणारा “चैतन्य पुरस्कार” ज्येष्ठ लोककलावंत बाजीराव थिटे, सिताराम महाराज सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष गणपत(तात्या) कुटे, सामाजिक कार्यकर्ते पै. प्रभाकर चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.

स्पर्धेमधील विजयी संघांना ज्येष्ठ उद्योजक किशोरशेठ दांगट यांच्या बक्षीस वितरण हस्ते करण्यात आले. माजी सरपंच रोहिदास वेठेकर, सोशल युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष विमलेशशेठ गांधी, कौसल्याताई जाधव मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष गणेशशेठ जाधव, जितेंद्र जाधव, ललित काळे साहेब, रोहित खर्गे, जनार्धन कुटे, दत्ता वेठेकर, विठ्ठल दुरगुडे, प्रा. दत्ता चव्हाण यावेळी उपस्थित होते.

स्पर्धेत स्पर्धा नियंत्रक म्हणून नंदकुमार भोईटे, पंच के. डी. वाघमारे. राजेश सोडळ, सुनील गायकवाड, राजेंद्र तांबे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक रघुनाथ चव्हाण यांनी तर सुत्रसंचालन अरविंद कुटे यांनी, समालोचन राशिद अन्सारी यांनी केले. स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आभार मानले. गुणलेखक म्हणून संदिप देवगिरे, केशव पठारे, सचिन वेठेकर, सलाम शेख, किरण कुटे, ऋषी मिंढे यांनी तर रेषा पंच शिवम कुटे, गौरव कदम, हरी जाधव, वैभव पवार, शुभम थिटे, विनय कुटे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अतुल पडवळ, अस्लम मोमीन, जावेद मोमीन, सचिन जाधव, गोविंद चव्हाण, ऋषी कुटे, शैलेश जाधव, चेतन जाधव यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल :
प्रथम क्रमांक : आमदार अतुलशेठ बेनके युवा मंच (आय. एस. सी. मालेगाव)
द्वितीय क्रमांक : केरुशेठ वेठेकर प्रतिष्ठान, (जामनेर)
तृतीय क्रमांक : सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रीज (खुर्शिद, मालेगाव)
चतुर्थ क्रमांक : बंटी फुड्स प्रॉडक्ट्स, (इस्तियाक, मालेगाव)
पाचवा क्रमांक : विद्यूत क्रिडा मंडळ, मांडवखार
सहावा क्रमांक : राहूलदादा जाधव युवा मंच (एम्स दिल्ली)
सातवा क्रमांक : जयंत घोरपडे, टेंभुर्णी.
आठवा क्रमांक : सिद्धीविनायक कंस्ट्रक्शन (डी. आर. पी. औरंगाबाद)
शिस्तबद्ध संघ : एस. एम. चैतन्य स्पोर्टस् असोसिएशन

वैयक्तिक बक्षिसे :
उत्कृष्ट शूटर – मित्तल नागर (एम्स दिल्ली),
उत्कृष्ट स्कूपर – शोएब शेख (जामनेर),
उत्कृष्ट नेटमन – प्रदिप कोल्हे (पुणे),
उत्कृष्ट सर्व्हिसमन – खुर्शिद अन्सारी (मालेगाव).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *