मटारू / करांदा

शास्त्रीय नाव : Dioscorea bulbifera Linn (डायोस्कोरिआ बल्बिफेरा)
कुल : Dioscoreaceae (डायोस्कोरिएसी)
इंग्रजी नाव : बल्ब बियरिंग याम (Bulb bearing yam)
स्थानिक नाव : करांदा, मटारू, गठालू, वाराही कंद.
उपयुक्त भाग : पाने, फळे

औषधी गुणधर्म

 • मटारू/ वाराही कंद हा वात कफ शामक असून, पचनशक्ती वाढविणारा आहे.
 • हृदय रोग, मधुमेह, कुष्ठ, जंत, विष, संधिरोग, रक्तविकारात लाभदायक आहे.
 • अपचन, त्वचारोग, रक्तस्राव, पित्ताशयाचा दाह, यावर गुणकारी आहे.
 • वीर्यवृद्धी व लघवीचे प्रमाण वाढवणारा आहे.

मटारु/करांद्याची भाजी

साहित्य
मटारु, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर, मसाला

कृती

 • एक पातेले घेऊन त्यात पाणी घेऊन मटारु मिठ घालुन उकळुन घ्यावे.
 • मटारुला सोलुन बारीक तुकडे करुन घ्यावे.
 • एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मिठ, हळद, व मसाला तळून घ्यावे.
 • नंतर त्यामध्ये मटारुचे बारीक तुकडे टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे.
 • अशा प्रकारे आपल्या आवडीची मटारुची भाजी तयार होईल.

मटारुच्या पानांची वडी

साहित्य
मटारुची कोवळी पाने, बेसन, तेल, तिखट, मीठ, हळद.

कृती

 • सर्वात प्रथम बेसन गव्हाच्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे.
 • त्यामध्ये चवीनुसार तिखट, मिठ, हळद मिसळून घ्यावे.
 • मळलेले बेसन पीठ मटारुच्या प्रत्येक पानावर पसरवुन मटारुची कोवळी पाने एकावर एक ठेऊन गुंडाळून घ्यावे.
 • मटारुच्या पानाच्या गुंडाळ्या वाफेवर शिजवून घ्यावे.
 • नंतर त्याचे बारीक तुकडे किवा वडया करुन तव्यावर तेलात टाकुन तळून घ्यावे.
 • अशा प्रकारे अळुच्या पानांची स्वादवडी तयार होईल.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, अर्थ

2 thought on “रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची”
 1. शेतिविषय अत्यंत म्हत्वाचे सामाजीक वृत्तपत्र सुरु खेले त्या बद्दल तुमचे मनपुर्वक शुभेच्छा व आभिनंदन…
  गरज होती आहे नेमके त्याच वेली वृतवेध हे पत्र आपण सुरु केलेले आहे
  विशेष ता शेतकरी व सामाजिक हीताची जपवणूक व्हावी, भविष्यात आपले वृत्तवेध पत्र शैतकरी कष्टकरी कामगार चार एक अविभाज्य अंग बनावे ही मनपुर्वक शुभेच्छा

  आपला स्नेहांकीत किसान पाईक

  विठ्ठल पवार राजे
  प्रदेशअध्यक्ष
  शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

  सदस्य;- ऊसदर नियमक मंडल महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 32.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *