नारायणगाव : कृषी व संलग्न पदवीधरांच्या शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान व शिवनेरी कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी कृषी विभागाचे माजी उपसंचालक किशोर उर्फ काकासाहेब डेरे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेहमेळाव्यात डेरे यांच्यासह कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या जुन्नर-आंबेगाव डासमुक्ती अभियान, देशी वनवृक्ष रोपवाटिका, कृषी पदवीधर कौशल्यवृद्धी व व्यवसाय विकास सेवा आदी प्रकल्पांमार्फत राज्यातील कृषी पदवीधर व शेतकऱ्यांसाठी अधिक भरिव कार्य करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील, अशी माहिती श्री. डेरे यांनी यावेळी दिली.

शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठानची नवनियुक्त कार्यकारणी पुढीलप्रमाणे : किशोर डेरे (अध्यक्ष), मनिष मोरे (उपाध्यक्ष), संतोष डुकरे (सचिव), किरण डुंबरे (खजिनदार), प्रविण महाले, भास्कर शिंदे, डॉ. प्रशांत पवार, डॉ. प्रशांत बेनके, रामदास दाते, धनेश पडवळ, अर्चना कोल्हे, वसंत पिंपळे, ज्ञानदेव आतकरी, अतुल टेमगिरे, प्रणय पाटे, सुधीर मोरडे, हेमंतकुमार डुंबरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *