घोळभाजी

शास्त्रीय नाव : Portulaca Oleracea
इंग्रजी नाव : Benghal Deflower
कालावधी : जुन ते सप्टेंबर नैसर्गिकरीत्या थोडी खारट चवीची घोळची भाजी पावसाळयात सर्वत्र येते. पाने मांसल, जाडसर हिरव्या रंगाची व देठ तांबूस रंगाचे असतात. लालसर कडांची पाने चवीला काहीशी खारट, आंबट व गोड अशी असतात.

औषधी गुणधर्म

  • या भाजीने कफ कमी होतो. भूक वाढते, पचनक्रिया सुधारते.
  • मूळव्याध व अतिसारावर ही भाजी गुणकारी आहे.

घोळ भाजी

साहित्य
घोळ भाजी, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर.

कृती

  • घोळेची तेलावर परतुन अथवा पीठ पेरुन पातळ भाजी करतात.
  • भाजी करण्यापुर्वी पाने गरम पाण्यातुन काढून घ्यावीत.
  • भाजीच्या रुक्षपणामुळे फोडणीला तेल जरासे अधिक लागते.
  • घोळीची सुकी अथवा पातळ भाजी करतात.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *