कपाळफोडी

शास्त्रीय नाव : Physalis Pubescens
कुळ : सॅपिडिएसी
स्थानिक नाव : फोफांडा
उपयुक्त भाग : पाने
कालावधी : वार्षिक (वेलवर्गीय फुले : ऑक्टोंबर – डिसेंबर)

औषधी गुणधर्म :

  • केशसंवर्धनासाठी वापरतात.
  • कानदुखीत व कानफुटीत कानात पू झाल्यास पानांचा रस कानात घालतात.
  • मासिक पाळी नियमित होत नसल्यास उपयोगी
  • जुनाट खोकला , छाती भरणे या विकारात उपयुक्त आमवातात मुळांचा काढा करतात.
  • पान एरंडेल तेलात वाटून सुजलेल्या सांध्यावर बांधतात.

कपाळफोडीची भाजी

साहित्य :
कपाळफोडीची पाने, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर

कृती :

  • कपाळफोडीची पाने स्वच्छ धुऊन चिरुन घ्यावीत.
  • एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व चिरलेली भाजी उकळुन घ्यावी. नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.
  • पातेल्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो तळून घ्यावे.
  • त्यामध्ये भाजी टाकुन मंद गॅसवर शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावी.
  • अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: