पाथरी

शास्त्रीय नाव : Launea procumbens
कुळ : ॲस्टरोएसी
उपयुक्त भाग : पाने
कालावधी : वर्षभर (फुले : नोव्हेंबर – डिसेंबर)

औषधी गुणधर्म

  • पाथरीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते.
  • चारा म्हणून वापरल्यास जनावरांचे दूध वाढते.
  • हे चाटण सुक्या खोकल्यास उपयुक्त आहे.
  • भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो.
  • कावीळ व यकृत विकारात ही भाजी उपयुक्त आहे.

पाथरीची भाजी

साहित्य
पाथरीची चिरलेली भाजी, ताक, मीठ, हिरवी मिरची, लाल मिरची, साखर, चणाडाळ, शेंगदाणे, बेसन, तेल, मेथी, मोहरी, हिंग, हळद, जिरे इ.

कृती

  • पाथरीची चिरलेली भाजी उकडून घ्यावी व पाणी टाकून द्यावे.
  • डाळ, शेंगदाणे, भिजवून तासाभराने दाणे, डाळ वेगवेगळे शिजवावे.
  • पाथरीची भाजी शिजवून घ्यावी. तेव्हाच मीठ, साखर, बेसन व ताक घालुन एकजीव करावे.
  • डाळ, दाणे घालावे. फोडणीत दोन्ही मिरच्या व इतर साहित्य घालुन त्यात एकजीव केलेली भाजी ओतावी व ढवळत राहून उकळावे.
  • ताकाऐवजी चिंचेचा कोळ व गुळ घालुनही भाजी करता येईल.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: