नंदकुमार जाधव मित्र परिवार, नागनाथपार गणेश मंडळाचा उपक्रम
पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी. शहरातील नागरिकांप्रमाणेच त्यांनाही हा आनंदोत्सव उत्साहाने साजरा करता यावा. यासाठी पुण्यातील नंदकुमार जाधव मित्र परिवार आणि नागनाथपार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टच्या वतीने कळकराई (ता. मावळ) या दुर्गम गावातील अदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ व एक महिन्याचा किराणा असे साहित्य दिवाळी भेट देण्यात आले.
पुण्यातील मित्र परिवाराच्या सहकार्यातून नंदकुमार जाधव हे गेली १३ वर्षं सातत्याने दुर्गम भागातील आदिवासी, भटके विमुक्त सामाजातील नागरिकांसमवेत आपली दिवाळी साजरी करत आहेत. रविवारी (ता.१७) पुण्यातील दानशुर नागरिक, युवकांनी कळकराई गावात जाऊन दिवाळी साजरी केली. भल्या सकाळी दिवाळीसाठी लागणारा फराळ, किराणा माल घेऊन हे सर्वजण कळकराईच्या दिशेने रवाना झाले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सर्वजण रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील मोगरज येथे पोचले.

मोगरज येथे कळकराई ग्रामस्थांनी सर्वांचे स्वागत केले. तेथून तीन बैल गाड्यांमधून किराणा माल, तर हलक्या वस्तू डोक्यावर घेऊन सर्वांनी जंगलातील वाटेतून कळकराईच्या डोंगराकडे वाटचाल केली. उन्हाचा चटका, प्रचंड उकाड्याने सुमारे सहा किलोमीटर अंतर कापताना सर्वांचीच दमछाक झाली. दोन वाजण्याच्या सुमारास सर्वजण कळकराईला पोचले. तेथे ग्रामस्थांनी सर्वांसाठी आधीच जेवणाची सोय केली होती. जेवणाच्या अस्वाद घेतल्यानंतर ग्रामस्थांना दिवाळी भेट दिली.

जेजूरी देवस्थानचे माजी विश्वस्त प्रसाद खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमात आजी-आजोबांचे औक्षण करून त्यांना नवीन कपडे देण्यात आले. गावातील ५० कुटुंबांना साखर, तेल, पोहे, रवा, बेसनपीठ, तूप, कडधान्य, डाळी, साबण, चहा पावडर, मसाले आदी महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, ब्लॅंकेट, कानटोपी, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, साबण, पणती, उटणे, रांगोळी आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात केले. गावातील ६५ महिलांना साड्या, ७० मुलामुलींना नवीन कपडेही देण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्रीप्रसाद गिरी, सुरेश मांदळे, विनायक अवसरे, वाल्मिक ढोरकुले, अमोल मुंडे, अमोल शुक्ला, विजय घोटे, मंगेश डाळिंबकर, प्रितेश केदारी, संतोष पंडीत, रविंद्र पठारे, सुनील अमरनाणी, मनिष मुदकवी, अभय लुंकड, प्रशांत पेंडसे, ॲड. प्रमोद पवार, अमित मोरे, श्रीकांत मोरे, प्रविण तांबेकर, अशोक जाधव, अनिल शिंदे, विनोद येलापुरकर, विशाल नाळे, दीपक गवळी, नितीन शहा, सुरेश ढमढेरे, रुपेश गुजराथी, राजेंद्र बलकवडे, गुलाब निवंगुणे, मुकुंद डिंबळे, डॉ. किरण हिंगे, किरण राहूरकर, दिलीप थोरात, दिलीप शेजवळ, केतन पायगुडे, नामदेव घाडगे, पंकज गांधी, गणेश परदेशी, जगदिश बोथाटे, संजय दळवी, संकेत मते, संजय सोमवंशी, संतोष कसपटे, उल्हास कदम, विशाल येलारपूरकर

पत्रकार रामकृष्ण येणेरे, सुनील जगताप, अमोल कुटे, संजय ऐलवाड, गणेश काळे, प्रविण दवंड, शुभम आव्हाळे, अभय भोसले, सिद्धेश जाधव, ओंकार परदेशी, स्वराज कोकाटे, धनंजय रसाळ, गणेश धनवे, बाळासाहेब परदेशी, अनिल गांजुरे, अजय वाघ त्याचबरोबर महिला प्रतिनिधी रश्मी जाधव, स्वाती शेठ, उमा चिकणे, कविता शिंदे, सुनंदा मोरे, रोहिणी जाधव, माधवी येलापूरकर, अंजली वाळके, शर्मिला गावडे, भारती थोरवे, रूपा मेहता, जयश्री पाटील, श्रूती जाधव, सलोनी सेठ, अंकिंता डोंगरे, इश्वरी येलापुरकर, सई फडकले आदींनी सहकार्य केले.