पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता. ३) कोकणात बहुतांशी ठिकाणी तर उर्वरीत राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा गुजरातमधील नालियापासून उदयपूर, गुना, गोंदिया, गोपालपूर या परिसरावरून पूर्वमध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय आहे. दक्षिण गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून हरियाणापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे.

राज्यात ३ सप्टेंबर रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

बंगालच्या उपसागरात तयार कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेले दोन-तीन दिवस राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती. ही प्रणाली विरून जाताच पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. आज (ता. ३) कोकणात बहुतांशी ठिकाणी तर उर्वरीत राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

राज्यात ३ सप्टेंबर रोजी हवामानाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात आज (ता.३) तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

गुरूवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये :

कोकण :
जव्हार ८०, तलासरी ७०, पालघर, श्रीवर्धन प्रत्येकी ५०, डहाणू, कल्याण, मालवण, मुलदे, मुरूड, रत्नागिरी प्रत्येकी ४०, देवगड, हर्णे, कुडाळ, मडगाव, म्हसळा, पेण, रोहा, सांगे प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :
गगणबावडा, जामनेर, यावल प्रत्येकी ५०, अक्कलकुवा, भुसावळ, जळगाव प्रत्येकी ४०, बोदवड ३०.

मराठवाडा :
अंबड, परतूर ३०, अर्धापूर, उस्मानाबाद, पूर्णा, उमरी, वडवणी प्रत्येकी २०.

विदर्भ :
अकोट, अंजनगाव, दर्यापूर प्रत्येकी ५०, बटकुली, तेल्हारा, वरूड प्रत्येकी ४०, अमरावती, चांदूरबाजार, चिखलदरा, घाटंजी, मारेगाव, मूर्तिजापूर, परतवाडा प्रत्येकी ३०.

हवामान अपडेट आणि शेतीविषयक बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *