कोकण हलक्या सरी, उर्वरीत महाराष्ट्रात उघडीप राहण्याची शक्यता

पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. उद्या (ता.२) कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह, मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेश आणि परिसरावर असून, ते मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे सरकत जाण्याची शक्यता आहे. हरियाणा आणि परिसरावरही हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा अनुपगडपासून या दोन्ही कमी दाब क्षेत्रांमधून उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.

राज्यात २ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे उत्तर भारतात मॉन्सून सक्रीय राहणार आहे. तर दक्षिण भारतात मात्र पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. उद्या (ता.२) महाराष्ट्रातील कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पावसाला पोषक हवामान नसल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण :
संगमेश्वर ५०, सांगे ५०, मडगाव ४०, कर्जत, राजापूर, रत्नागिरी ३०.
मध्य महाराष्ट्र :
महाबळेश्वर ७०, राधानगरी ४०, गगणबावडा २०, नवापूर २०, पन्हाळा २०, शाहूवाडी २०, वेल्हे २०.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *