नांदेड, लातूर, गडचिरोलीत जोरदार पाऊस

पुणे : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात मॉन्सून सक्रीय होऊ लागला असून, विविध ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. गुरूवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये लातूर, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. गडचिरोलीतील देसाईगंज येथे सर्वाधिक १२१ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

बुधवारी (ता. ७) दुपारनंतर राज्यात ढग गोळा झाले. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाड्यातील हिंगोली, लातूर नांदेड, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. राज्याच्या इतरही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडल्या. अनेक भागात रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता. गुरूवारी दुपारपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये (स्त्रोत: हवामान विभाग) :
कोकण :
रायगड : खालापूर ४३, मुरूड ४३.
रत्नागिरी : दापोली ४०, मंडणगड ४०, राजापूर ८४.
सिंधुदुर्ग : कणकवली ३६, कुडाळ ४२, रामेश्वर ९१.

मध्य महाराष्ट्र :
नाशिक : इगतपूरी ३०.
पुणे : लोणावळा ३४.
सोलापूर : जेऊर २०, करमाळा २५.

मराठवाडा :
औरंगाबाद : पैठण ३२.
बीड : आंबेजोगाई ४३.
हिंगोली : औंढा नागनाथ २२, हिंगोली २१, सेनगाव ३३, वसमत २२.
जालना : बदनापूर ३६.
लातूर : निलंगा ५३, लातूर ४०.
नांदेड : अर्धापूर ३३, भोकर ४८, बिलोली ५१, देगलूर ३२, धर्माबाद ७२, हादगाव ४०, हिमायतनगर ३३, कंधार ४६, किनवट ७४, मुदखेड ६९, मुखेड ६२, नायगाव खैरगाव ४०, नांदेड ४४, उमरी ४३.

विदर्भ :
भंडारा : मोहाडी ४९.
चंद्रपूर : ब्रह्मपूरी ५१, नागभीड ३७.
गडचिरोली : अरमोरी ३१, देसाईगंज १२१, कुरखेडा ५०, कोर्ची ३१,
गोंदिया : अर्जूनी मोरगाव ६४, देवरी ६२, गोंदिया ४२, गोरेगाव ४०, सडकअर्जूनी ४२.
यवतमाळ : उमरखेड ३०

शुक्रवार (ता. ९) राज्यातील हवामान विभागनिहाय पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा इशारा
उद्या (ता.९) कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जिल्हानिहाय पावसाचा विचार करता उद्या (ता.९) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम विदर्भ आणि उत्तर कोकणातील काही जिल्हे वगळता उर्वरीत राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांसह, हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवार (ता. ९) राज्यातील जिल्हानिहाय पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *