विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, कोकणातही सक्रीय होणार पाऊस

पुणे : पावसात मोठा खंड पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मोठ्या विश्रांतीनंतर मॉन्सून पुन्हा सक्रीय होणार आहे. अनेक भागात ढगांची दाटी होऊन, पावसाला सुरूवात झाली आहे. आजपासून (ता.८) राज्यात पाऊस जोर धरणार असून, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यानंतर अरबी समुद्रावरून नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. यातच बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत (ता. ११) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या दोन्ही स्थिती पोषक ठरल्याने राज्यात पावसाला सुरूवात होणार आहे.

गुरूवारी (ता.८) राज्याच्या विविध जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

आजपासून राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जिल्हानिहाय पावसाचा विचार करता आज (ता. ८) कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम विदर्भ आणि उत्तर कोकणातील काही जिल्हे वगळता उर्वरीत सर्वच जिल्ह्यांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *