जून महिन्यात राज्यात ३१ टक्के अधिक पावसाची नोंद

अमोल कुटे

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) जूनअखेरपर्यंत राज्यात २७२.९ मिलीमीटर (३१ टक्के अधिक) पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आलंय. पूर्वमोसमी पावसाबरोबरच मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकण, घाटमाथा आणि विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावल्याने सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र जूनच्या अखेरच्या टप्प्यात पावसाचे प्रमाण कमी होऊन, काही भागात खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

यंदा वेळेआधीच म्हणजेच पाच जून रोजी मॉन्सून राज्यात दाखल झाला. तर १० जून रोजी मॉन्सूनने संपुर्ण राज्य व्यापले. राज्य व्यापल्यानंतर कोकण, विदर्भात जोरदार बरसणाऱ्या मॉन्सूनने उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात दडी मारली. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती न होणे, मॉन्सूनच्या प्रवाहांचा वेग मंदावणे, अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा न होणे या कारणांमुळे राज्यात पावसाने २० जून नंतर राज्यातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली.

जून महिन्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक, तर विदर्भात सरासरी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील अकोला व मध्य महाराष्ट्रातील धुळे व नंदूरबार जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची, तर मुंबई उपनगरासह सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

जून महिन्यात राज्यात पडलेला पाऊस (सौजन्यः हवामान विभाग)

जूनअखेरपर्यंत राज्यात सरासरी २०७.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा पावसाने सरासरी ओलांडली असून, कोकणात ९७३.६ मिलिमीटर (४१ टक्के अधिक), मध्य महाराष्ट्रात २०२.५ मिलिमीटर (२९ टक्के अधिक), मराठवाड्यात १८०.१ मिलिमीटर (३० टक्के अधिक), तर विदर्भात २०३.६ मिलिमीटर (१९ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे.

जून महिन्यात राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस

विभागसरासरीपडलेलाटक्केवारी
कोकण६८९.७९७३.६४१
मध्य महाराष्ट्र१५७.०२०२.५२९
मराठवाडा१३८.०१८०.१३०
विदर्भ१७०.६२०३.६१९
सौजन्य : भारतीय हवामान विभाग

धरण क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतिक्षा
जून महिन्यात झालेला पूर्व मोसमी पाऊस, मॉन्सून दाखल झाल्यानंतर नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात नद्यांना पूर आले. मात्र उर्वरीत महाराष्ट्रातील बहुतांशी धरणांच्या पाणलोटामध्ये पावसाने सामाधानकारक हजेरी लावली नाही. धरणे भरण्यासाठी पुढील काळात जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

अकोला, धुळे, नंदूरबारमध्ये पावसाची ओढ
जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची विचार करता, यंदा विदर्भातील अकोला (उणे ५१ टक्के) उत्तर मध्य महाष्ट्रातील धुळे (उणे ३८), नंदुरबार (उणे ३०) जिल्ह्यात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. तर मुंबई उपनगरासह (अधिक ९० टक्के) सातारा (अधिक ८३ टक्के), कोल्हापूर (अधिक ७३ टक्के), परभणी (अधिक ७२ टक्के), जालना (अधिक ६३ टक्के) जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

जून महिन्यात देशाच्या विविध विभागात पडलेला पाऊस (सौजन्यः हवामान विभाग)

देशात ११० टक्के पाऊस
यंदाच्या मॉन्सून हंगामात जूनपर्यंत देशातही समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. देशात १६६.९ मिलीमीटर पावसाची (१० टक्के अधिक) नोंद झाली आहे. जून महिन्यात देशात सरासरी १८२.९ मिलिमीटर पाऊस पडतो. देशातील ३६ प्रमुख हवामान विभाग विचारात घेता, यंदा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सर्वाधिक, तर लडाख सर्वात कमी पाऊस पडला असून, जम्मु काश्मिर, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, त्रिपूरा, केरळ विभागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

जून महिन्यात राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती (पावसातील तफावत टक्क्यांमध्ये)

जिल्हासरासरीपडलेलाटक्केवारी
मुंबई शहर५४०.९६९४.८२८
पालघर४११.९५८५.२४२
रायगड६५५.८९८५.७५०
रत्नागिरी८१३.५१२२३.६५०
सिंधुदुर्ग८८०.११०९७.९२५
मुंबई उपनगर५०५.०९६१.४९०
ठाणे४६१.९७३१.०५८
नगर१०८.२१२३.७१४
धुळे१२१.५७५.२उणे ३८
जळगाव१२३.७१२७.१
कोल्हापूर३६२.९६२६.६७३
नंदूरबार१५५.९१०९.७उणे ३०
नाशिक१७४.४१६३.२उणे ६
पुणे१७६.२२६१.८४९
सांगली१२९.०१७५.७३६
सातारा१९४.१३५५.७८३
सोलापूर१०२.५११८.०१५
औरंगाबाद१२५.२१६८.७३५
बीड१२८.४१६६.१२९
हिंगोली१६९.२१९०.८१३
जालना१३२.६२१६.६६३
लातूर१३५.४१४७.३
नांदेड१५५.४१८०.५१६
उस्मानाबाद१२६.९१४३.७१३
परभणी१४५.३२४९.७७२
अकोला१३६.९६७उणे ५१
अमरावती१४५.७१८३.३२५
भंडारा१८९.३२६८.८४२
बुलडाणा१३९.३१३५.५उणे ३
चंद्रपूर१८३.५२५१.३३७
गडचिरोली२१०.९२१५.२
गोंदिया१९२.८१९१.०उणे १
नागपूर१६६.३२२३.४३४
वर्धा१७४.१२२९.७३२
वाशीम१६६.४२१९.९३२
यवतमाळ१६३.९२२६.५३८
सौजन्य : भारतीय हवामान विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *