पुणे : राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रब्बी हंगाम (२०२०) पीक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीतून पीकनिहाय तीन विजेत्या शेतकऱ्यांना अनुक्रमे पन्नास हजार रुपये, चाळीस हजार रुपये आणि तीस हजार रुपयांचे परितोषिक देण्यात येणार आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढेल. आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. या उद्देशाने कृषि विभागामार्फत राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविली जात आहे.

सन २०२० च्या रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, जवस, तीळ व करडई या सहा पिकांसाठी पीकस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तथापी जवस व तीळ या दोन पिकांसाठी स्पर्धक संख्या कमी असल्याने स्पर्धा झाल्या नाहीत. उर्वरीत रब्बी ज्वारी, गहू, हरभरा व करडई या चार पिकांसाठी राज्यामधुन एकुण सहा हजार ५३ स्पर्धक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यास्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :

रब्बी ज्वारी

सर्वसाधारण गट
प्रथम क्रमांक : श्री.साहेबराव मन्याबा चिकणे, मु.पो. सोनगांव, ता.जावली, जि.सातारा (१०१ क्विं/हे)
द्वीतीय क्रमांक : श्री. सोमनाथ बाबुराव मुंडेकर, मु.पो.आरसोली, ता.भुम, जि.उस्मानाबाद (९४.३० क्विं/हे)
तृतीय क्रमांक : श्री.नितीन बाजीराव वरखडे, मु.पो.वरखडवाडी, ता.वाई, जि.सातारा (९० क्विं/हे)

आदिवासी गट
प्रथम क्रमांक : श्री. आटया देवजी पाडवी, पो.खेडले, ता.तळोदा, जि.नंदुरबार (५१.५० क्विं/हे)
द्वीतीय क्रमांक : श्री.नोवा आटया पाडवी, मु.पो.नर्मदानगर, ता.तळोदा, जि.नंदुरबार (४३ क्विं/हे)
तृतीय क्रमांक : श्री.बापू नागो पवार, मु.पो.कळंबू, ता.शहादा, जि.नंदुरबार (३६.४० क्विं/हे)

गहू

सर्वसाधारण गट
प्रथम क्रमांक : श्री.सुहास वसंतराव बर्वे, मु.पो.डुबेरे, ता.सिन्नर, जि.नाशिक, (९०.७१ क्विं/हे)
द्वीतीय क्रमांक : श्री.आप्पासाहेब नामदेव आरोटे, मु.पो.महाजनपूर, ता.सिन्नर, जि.नाशिक (९० क्विं/हे)
तृतीय क्रमांक : श्री. शिवाजी बाजीराव सोमवंशी, मु.पो.सुंदरपूर, ता.निफाड, जि.नाशिक (८२.९८ क्विं/हे)

आदिवासी गट
प्रथम क्रमांक : श्री. विठ्ठल भिवा आवारी, मु.पो.साकुर, ता.ईगतपुरी, जि. नाशिक (६०.१० क्विं/हे)
द्वीतीय क्रमांक : श्री. सुधाकर बापूराव कुंभेरे, मु.पो.लोणसावळी, ता.वर्धा, जि वर्धा. (५४ क्विं/हे)
तृतीय क्रमांक : श्री. महेंद्र दौलत नैताम, मु.पो. खैरगाव दे., ता. पांढरकवडा, जि.यवतमाळ (५३.६८ क्विं/हे)

हरभरा

सर्वसाधारण गट
प्रथम क्रमांक : श्री. वसंत पांडुरंग कचरे, मु.पो. काटेवाडी, ता.खटाव, जि.सातारा (६३.१० क्विं/हे)
द्वीतीय क्रमांक : श्री.सुरेश देवबा चेके, मु.पो. पिंपरी (मे), ता.वर्धा, जि.वर्धा (५५ क्विं/हे)
तृतीय क्रमांक : श्रीमती सुमन शिवाजी जगताप, मु.पो.सुरवड, ता.इंदापूर, जि.पुणे (५४.३२ क्विं/हे)

आदिवासी गट
प्रथम क्रमांक : श्री. हिराचंद मोतीराम गावीत, मु.पो.धनेर दि.,ता.कळवण, जि.नाशिक (४८.३० क्विं/हे)
द्वीतीय क्रमांक : श्री. कैलास राजाराम पवार मु.पो.ईनशी, ता.कळवण, जि.नाशिक (४२.२६ क्विं/हे)
तृतीय क्रमांक : श्री. देवराव कोन्दुजी शेडमाके, मु.पो.डोंगरगांव मक्ता, ता.गोडपिंपरी, जि.चंद्रपूर (४१.३१ क्विं/हे)

करडई

सर्वसाधारण गट
प्रथम क्रमांक : श्री. राजेश हनमंतराव हाळदे, मु.पो.आतूर, ता.देगलूर, जि.नांदेड (३४.७२ क्विं/हे)
द्वीतीय क्रमांक : श्री. निल नामदेव चिमनपाडे, मु.पो. कुडली, ता.देगलूर, जि.नांदेड (२७.७९ क्विं/हे)
तृतीय क्रमांक : श्री. प्रतापरेडडी देवन्ना चिंतलवार, मु.पो.आलूर, ता.देगलूर, जि.नांदेड (२३.५६ क्विं/हे).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: