ग्रामपंचायत, आरोग्य व शिक्षण विभागाच्या समन्वयाने विविध उपक्रम

पुणे : देशात कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. संसर्ग प्रतिबंदासाठी वैयक्तिक शारिरिक व सार्वजनिक स्वच्छता असणे महत्वाचे आहे. त्यासाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारने “गंदगी मुक्त भारत’ मोहिम सुरु केले आहे. 8 ते दि. 15 ऑगस्ट दरम्यान, ही मोहीम पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये राबविली जाणार असल्याचे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

अभियानाच्या पहिल्या दिवशी सर्व सरपंच यांचे बरोबर व्हिडियो कॉन्फरस घेवून हागणदारीमुक्त ग्रामपंचायत, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारीमुक्त सातत्यचे उपक्रम, सार्वजनिक शौचालय, शाळा, अंगणवाडी स्वच्छता गृह यांची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी व वैयक्तिक स्तरावर आढळणारे एकवेळ वापरावयाचे प्लासटीकचे एकत्रीकरण व विघटन उपक्रम राबविण्यात आला. तिसऱ्या दिवशी ग्रामस्तरावर श्रमदानाव्दारे गावचा परिसर स्वच्छ करणे, हागणदारीमुक्त सातत्य बाबत जनजागृती करणे आणि हागणदारी मुक्तीबाबत मार्गदर्शन देण्यात आले. कोरोना संसर्ग प्रादुर्भावचे अनुषगांने आवश्‍यक सर्व दक्षता घेवून गावातील भिंतीवर स्वच्छता विषयक म्हणी चित्र स्वरुपात रंगकाम करण्यात आले.

पर्यावरण संतुलनाकरिता गावामध्ये वृक्षारोपण करणे. गंदगी मुक्त मेरा गाव या विषयावर विद्यार्थ्यासाठी ऑन लाईन चित्रकला स्पर्धा आणि निंबध स्पर्धां घेणे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवून आरोग्य केंद्र, रुग्णालये व परिसर स्वच्छ करणे असे उपक्रम राबविण्यात आले. तर स्वातंत्र्यदिनी गावच्या ग्रामसभेत नव्या हागणदारीमुक्ती कार्यक्रमाची घोषणा करण्यात येणार आहे. हे सर्व उपक्रम ग्रामपंचायत, आरोग्य व शिक्षण विभागाच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. गावस्तरावर कोरोना संसर्ग प्रादुर्भावाचे अनुषगांने आवश्‍यक प्रतिबंधत्मक दक्षता घेवून कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: