दिवाळीपर्यंत तेजी कायम राहणार

पुणे : श्रावणातील उपवास, त्यापाठोपाठ येणार्‍या सणांमुळे ग्राहकांकडून गुळाला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात गुळाच्या क्विंटलच्या दरात १५० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गुळाला प्रति किलो ५० ते ६० रुपये दर मिळत आहे. मागणी कायम राहणार असल्याने दिवाळीपर्यंत दर तेजीत राहतील, अशी माहिती व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.


दर वर्षी श्रावण महिना सुरू होताच गुळाला मागणी वाढते. ही मागणी दिवाळीपर्यंत टिकून असते. गोकुळ अष्टमी, गौरी-गणपती, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीत आदी सणामुळे गुळाला मागणी वाढते. सध्या मार्केटयार्डात गुळाची आवक चांगली होत आहे. रोज चार हजार ढेपांची, तर चार टनांपर्यंत बॉक्सची आवक होत आहे. दौंड तालुक्यातील नानगाव, पाटस, केडगाव, यवत, कानगाव, वडगाव येथील गुऱ्हाळातून सर्वाधिक आवक होत आहे. तसेच शिरूरमधील मांडवगण फराटा भागातून आवक होत आहे. शिरूर आणि दौंड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर गुळाचे उत्पादन करतात.

सांगली, कजहाड, पाटण भागातूनही गुळाची आवक होत आहे. भुसार बाजारातून ठाणे, नाशिक भागात गूळ विक्रीस पाठविला जातो. पुणे शहर आणि उपनगरातील किरकोळ व्यापारी सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर गूळ खरेदी करतात. गुळाचा सर्वाधिक वापर घरगुती ग्राहकांकडून केला जातो. सेंद्रिय गुळाच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मिठाई विक्रेत्यांकडून गुळाला होणारी मागणी घटली आहे.

घाऊक बाजारातील गुळाचे दर (क्विंटल)

गुळकिंमत
नं.३३५०० ते ३७००
नं.2३७५० ते ३९००
नं.1४००० ते ४१००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: