zilla parishad

पुणे : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या जागा वापराविना पडून असल्याने त्यावर अतिक्रमण होत आहे. या जागा विकसीत केल्या तर जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीस मदत होणार असल्याने दौंड व वडगाव मावळमध्ये व्यापारी संकुल बांधण्यास जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे.

दौंड शहरात जिल्हा परिषदेच्या बंद असलेल्या उर्दू शाळेची जागा आहे. त्या जागेचा विकास केल्यानंतर जिल्हा परिषदेला मोठे उत्पन्न सुरू होईल. याशिवाय भविष्यात जागेवर होणारे अतिक्रमण टाळता येईल असे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी म्हटले. त्याबरोबरच सभापती बाबुराव वायकर यांनी वडगाव मावळमधील जिल्हा परिषदेच्या शाळेची जुनी इमारत असून त्याठिकाणी व्यापारी संकुल बांधता येऊ शकते असे सांगितले. या दोन्ही ठिकाणच्या व्यापारी संकुल व कम्युनिटी हॉल बांधण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.

जिल्हा परिषदेच्या मालकी जागा किंवा गाळे भाडेतत्त्वार देताना शिफारशीवरून देण्याची की निविदा प्रक्रिया राबवून देण्याची याबाबत धोरण निश्चित करावे. त्यामुळे भविष्यात भाडेतत्त्वावर जागा किंवा गाळे देताना वेगवेगळे नियम अवलंबले जाणार नाहीत. त्यासाठी धोरण ठरावावे असे सर्वसाधारण सभेत गटनेते शरद बुट्टे-पाटील यांनी म्हणणे मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *