निराधार ज्येष्ठांची दिवाळी झाली गोड ; नंदकुमार जाधव मित्र परिवाराचा उपक्रम

पुणे : जीवनाच्या अखेरच्या वळणावर कुटुंबातील कोणाचा असरा नाही, कोणी सगा सोयरा नाही, वृद्ध शरिराची साथ नाही, अशा ज्येष्ठ निराधारांचे आश्रयकेंद्र असलेल्या राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्रात यंदा दिवाळीची गोडी आणखी वाढली. पुण्यातील नंदकुमार जाधव मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दिवाळी भेटवस्तू वाटप उपक्रमामुळे आजी-आजोबांच्या डोळ्यात असू अन् चेहऱ्यावर हसू अशा वातावरणात संपुर्ण परिसर भारून गेला.

पुण्यातील मित्र परिवाराच्या सहकार्यातून नंदकुमार जाधव हे गेली १२ वर्षं सातत्याने दुर्गम भागातील आदिवासी, भटके विमुक्त सामाजातील नागरिकांसमवेत आपली दिवाळी साजरी करत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा जुन्नर तालुक्यातील पांगरी माथा, बल्लाळवाडी येथील शिवनेर प्रतिष्ठानच्या “राजाराम पाटील वृद्धाश्रमात” दिवाळी भेट उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

रविवारी (ता.८) सकाळी पुण्यातील दानशुर नागरिक, युवकांनी केंद्रात जाऊन दिवाळी साजरी केली. केंद्रात रांगोळी, आकाशकंदील लावून दिवाळीची सजावट करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार दत्ता मस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या छोटेखाणी कार्यक्रमात आजी-आजोबांचे औक्षण करून त्यांना नवीन कपडे देण्यात आले. समाजातील उपेक्षित घटकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून, समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे, असे नंदकुमार जाधव, डॉ. प्रसाद खंडागळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

निराधारांच्या या केंद्राला गहू, तांदूळ, साखर, तेल, पोहे, रवा, बेसनपीठ, तूप, कडधान्य, डाळी, साबण, चहा पावडर, मसाले आदी वर्षभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, ब्लॅंकेट, कानटोपी, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, उटणे आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात केले.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्रीप्रसाद गिरी, सुरेश मांदळे, डॉ. प्रसाद खंडागळे, पोलिस उप निरीक्षक वाल्मिक ढोरकुले, वनाधिकारी अमोल मुंडे, अमोल शुक्ला, संतोष पंडीत, रविंद्र पठारे, सुनील अमरनाणी, मनिष मुदकवी, निखिल बिबवे, अभय लुंकड, प्रशांत पेंडसे, ॲड. प्रमोद पवार, पवनकुमार पाठक, संतोष कस्पटे, अमित मोरे, श्रीकांत मोरे, प्रविण तांबेकर, अशोक जाधव, अनिल शिंदे, उल्हास कदम, शिल्पकार विनोद येलापुरकर, विशाल नाळे, दीपक गवळी, नितीन शहा, सुरेश ढमढेरे, रुपेश गुजराथी, राजेंद्र बलकवडे, दत्ता साळुंके, मनोज पंडीत, गुलाब निवंगुणे, मुकुंद डिंबळे, डॉ. किरण हिंगे, महादेव दाते, किरण राहूरकर, गजानन घैसास, दत्ता साबणकर, दिलीप थोरात, दिलीप शेजवळ, केतन पायगुडे, दत्ता पायगुडे, पोपटशेठ ओसवाल, नितीन नहार, सोनू ढमढेरे,

नामदेव घाडगे, सुनील जगताप, अमोल कुटे, संजय ऐलवाड, कांतीलाल जैन, राजू खर्डेकर, राजू घोडके, विजय घोटे, सचिन परदेशी, गणेश काळे, सिद्धेश जाधव, ओंकार परदेशी, स्वराज कोकाटे, ॲड. आप्पासाहेब राजगुरू, नंदू फडके, आदित्य तापडीया, पुर्णेश मुळे, त्याचबरोबर महिला प्रतिनिधी रश्मी जाधव, स्वाती शेठ, कविता शिंदे, पूजा मोहोळ, अंजली वाळके, शर्मिला गावडे, भारती थोरवे, रूपा मेहता, जयश्री पाटील, सोनाली शेळके, कल्पना ओतूरकर, श्रूती जाधव, सिद्धी साळुंके, संमृद्धी सेठ, योगिनी परदेशी, अंकिंता डोंगरे, राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आधार केंद्राला जमीन देणाऱ्या सुमन जाधव, जगन शिंदे, केंद्राचे अध्यक्ष विवेक तांबोळी, उपाध्यक्ष मंगेश गाढवे, सचिव भानूदास कोकणे, रामकृष्ण येणेरे आदींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: