निर्मला पानसरे ; पाच कोटीचे थकीत भाडेही द्या

पुणे : जिल्हा परिषदेच्या जून्या इमारतीचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणे असलेले पाच कोटी रुपयांचे भाडे मिळावे. आजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ताबा असलेल्या, बंद खोल्या परत मिळाव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये विभाग कार्यरत होते. जिल्हाधिकारी कार्यालय नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाले परंतु अद्यापही काही विभागांचे साहित्य जुन्या इमारतीमध्ये कुलूपबंद ठेवले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या काही विभागांना नवीन इमारतीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे जुन्या इमारतीमध्ये स्थलांतरित करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील महिला सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांना विविध कामांसाठी जिल्हा परिषदेमध्ये यावे लागते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणार्‍या महिला प्रतिनिधींना पुण्यात आल्यानंतर विश्रांतीसाठी कुठे जागा नाही. याबरोबरच या इमारतीमधील जागा भाडे तत्त्वावर मिळण्यासाठी विविध कार्यालये मागणी करत आहेत. त्यामुळे तातडीने भाडेपोटी देण्याची रक्कम देण्याची आणि बंद खोल्या रिकाम्या करण्याचे आदेश देण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *