पुणे : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ७ हजार ४२५ कुटुंबांना घरे दिली जाणार आहेत. राज्य शासनाकडून उद्दिष्टामध्ये वाढ करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकार्‍यांना पत्र पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून देण्यात आली.

राज्य शासनाकडून पुणे जिल्ह्यासाठी अनुसूचित जाती ५६४, अनुसूचित जमाती ५५, इतर संवर्गासाठी ६ हजार ८०६ असे एकूण ७ हजार ४२५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील वर्षात ३ हजार ८०० घरे देण्यात आली आहे. तर काही घरांसाठी जागेची समस्या असल्याने काही लाभार्थ्यांना घरे मिळू शकलेली नाहीत.

दरम्यान, जिल्ह्यातील घरांचे उद्दिष्ट कमी साध्य झाल्याने जिल्हा परिषदेने अभियान राबवून प्रत्येक विभागप्रमुखांना गावोगाव पाठवून आढावा घेण्यास सांगितला होता. तसेच ज्या घरांची कामे अपूर्ण आहेत, ती पूर्ण करण्याच्या सूचना करून एकाच दिवशी घरांची जिल्ह्यात घरांचे उद्घाटने केली होती. आता यावर्षी जास्त उद्दिष्ट देण्यात आले आहे.

तालुकानिहाय उद्दिष्ट पुढील प्रमाणे : आंबेगाव १७१, बारामती १६११, भोर ४५१, दौंड ८१४, हवेली १६२, इंदापूर २४६४, जुन्नर ३९०, खेड २३०, मावळ ५६, मुळशी १७०, पुरंदर ३२१, शिरूर ४३२, वेल्हा १५३.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!