पुणे : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सत्तावीस रिक्त जागांसाठी गुरुवारी (ता.५) निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सर्वच समित्यांच्या २५ रिक्त पदांची निवडणूक बिनविरोध झाली. तर पशुसंवर्धन व कृषी समितीची प्रत्येकी एक जागा रिक्त राहिल्याचे पिठासन अधिकारी, अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी घोषित केले.

उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती प्रमोद काकडे, बाबुराव वायकर, पूजा पारगे, सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह गटनेते, विरोधी पक्षनेते, सदस्य उपस्थित होते.

विषय समित्यांची रिक्तपदे भरण्यासाठी २७ जागांसाठी ३३ सदस्यांनी अर्ज केले होते. मात्र छाननी दरम्यान काही सदस्यांनी माघार घेतल्याने निवडणुक बिनविरोध झाली. शिक्षण समितीच्या एक जागेसाठी शोभा कदम यांच्या एकच अर्ज, जलव्यवस्थापन समितीच्या एका जागेसाठी शेळके राणी यांचा एकमेव अर्ज आल्याने या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या. तर अर्ज न आल्याने पशुसंवर्धन समितीची एक तर कृषी समितीची एक जागा रिक्त राहिली.

विषय समितीनिहाय नवनिर्वाचित सदस्यांची नावे :

स्थायी समिती : वीरधवल जगदाळे, अंकुश आमले.

बांधकाम समिती : सुजाता पवार, भरत खैरे, भगवान पोखरकर.

आरोग्य समिती : विवेक वळसे-पाटील, पांडुरंग ओझरकर, जयश्री पोकळे.

समाजकल्याण समिती : कीर्ती कांचन

कृषी समिती : प्रवीण माने, संजय गवारी, नीता बारवकर (एक जागा रिक्त)

पशुसंवर्धन समिती : विशाल तांबे, आशा शितोळे, मोनिका हरगुडे. (एक जागा रिक्त)

अर्थ समिती : विश्वास देवकाते, सुरेखा चौरे, अंकिता पाटील, श्रीधर केंद्रे, नलिनी लोळे, दिनकर सरपाले, स्वाती शेंडे, निकिता घोटकुले

शिक्षण समिती : शोभा कदम

जलव्यवस्थापन समिती : राणी शेळके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *