तांदूळजा / चवळाई

शास्त्रीय नाव : ॲमरँथस (amaranthus)
इंग्रजी नाव : ॲमरँथ
कुळ : ॲमरँटेसी
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याची भाजी करतात. तांदूळजा / चवळाई ही माठ, राजगिरा यांच्या वंशातील (ॲमरँथस ) असल्यामुळे त्यांची अनेक शारीरिक लक्षणे सारखी आहेत.

औषधी गुणधर्म

 • फ्ल्यू, टायफाईड, मलेरिया अशा आजारांमध्ये तोंडाची चव गेलेल्या रुग्णाला भाजी आवर्जून देतात.
 • भाजी खाल्याने भूक अतिशय चांगली लागते.
 • ताप, चक्कर यावर ही भाजी गुणकारक आहे.
 • तांदूळजाचा रस काढून पिल्याने पोटाचे विकार कमी होतात.
 • शरीरात सी जीवनसत्वासाठी तांदूळजाची भाजी खावी.
 • उष्णतेच्या तापात विशेषत: गोवर, कांजण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे.
 • विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मूळव्याध, यकृत व पाथारी वाढणे या विकारात पथ्यकर म्हणून जरुर वापरावी.
 • उपदंश, महारोग, त्वचेचे समस्त विकार यामध्ये दाह, उष्णता कमी करावयास तांदूळजा फार उपयुक्त आहे.
 • नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीकरिता बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी वरदान आहे.
 • डोळ्याच्या विकारांत आग होणे, कंड सुटणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारीकरीता फार उपयुक्त आहे.

तांदुळज्याची भाजी

साहित्य

तांदुळज्याची कोवळी पाने, चिरलेला कांदा, तेल, मीठ, हिरवी मिरची.

कृती

 • तांदूळज्याची कोवळी भाजी चांगली धुवून घ्यावी.
 • कढईत तेल टाकून, त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, मीठ मंद आचेवर परतून घ्यावे.
 • त्यात धुतलेली तांदूळज्याची भाजी टाकावी, मंद आचेवर ही भाजी शिजवून घ्यावी.
 • तांदूळजाच्या भाजीत ताक किंवा दही घालून कढी देखील केली जाते.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, मराठी विश्वकोश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!