पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. मंगळवारी (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून, राजस्थानच्या बिकानेरपासून, जयपूर, गुना, गोंदिया ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर परस्पर विरोधी वारे वाहत (शेअर झोन) आहेत.

कमी दाब क्षेत्र झेपावतेय मध्य भारताकडे
बंगालच्या उपसागराच्या उत्तर आणि पूर्व-मध्य भागात ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत ही प्रणाली मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे.

राज्यात ७ सप्टेंबर रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात इशारा

मंगळवारी (ता. ७) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भासह, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज आलर्ट)
कोकण : रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड.

राज्यात ७ सप्टेंबर रोजी जिल्हानिहाय हवामान इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : मुंबई.
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर.
मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर.
विदर्भ : चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया.

मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी

मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ही जोरदार पाऊस पडला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेली परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती यामुळे पोषक हवामान असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी (ता. ५) मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पाऊस झाला.

कोकणातील सिंधूदूर्ग, रत्नागिरी, तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, नगर, धुळे जळगाव, नाशिक जिल्ह्यासह अनेक भागात जोरदार पाऊस पडला. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये :

कोकण :
रायगड : कर्जत ३८, माथेरान ३९.
रत्नागिरी : गुहागर ३१, राजापूर ३८, रत्नागिरी ४५.
सिंधुदुर्ग : देवगड ७५, दोडामार्ग ३१, कणकवली ५०, कुडाळ ५२, मालवण ३२, मुलदे (कृषी) ५५, सावंतवाडी ६०, वैभववाडी ३८.

मध्य महाराष्ट्र :
नगर : नगर ३३, जामखेड ३१, शेवगाव ३८,
धुळे : धुळे ४४.
जळगाव : चाळीसगाव ३६.
कोल्हापूर : चंदगड ३०, गगणबावडा ६०, राधानगरी ४८.
नाशिक : मालेगाव ४१.
सोलापर : जेऊर ३०, मोहोळ ४५, सांगोला ४०.

मराठवाडा :
बीड : अंबाजोगाई ७४, आष्टी ३१, माजलगाव ५५, परळी वैजनाथ ४५, पाटोदा ७६, वाडवणी ७०.
हिंगोली : औंढा नागनाथ ५८.
जालना : घनसांगवी ४०.
नांदेड : नायगाव खैरगाव ३९.
उस्मानाबाद : भूम ५१, कळंब ६१, लोहारा ३१, उस्मानाबाद ३२, उमरगा ६३, वाशी ५४.
परभणी : धालेगाव ६१, गंगाखेड ४२, मानवत ४०, पालम ३२, पाथरी ४७.

विदर्भ :
चंद्रपूर : गोंडपिंपरी ५७, पोंबुर्णा ७०.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *