पुणे : राज्यात पावसाने दडी मारल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. उद्या (ता.८) कोकणात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह हवामान मुख्यत: कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पूर्व मध्य प्रदेशात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असून, उद्या ते निवळून जाण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर पासून कमी दाब क्षेत्राच्या केंद्रामधून दिघा ते पूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मॉन्सूनच्या आसाचे पश्चिम टोक उद्यापासून उत्तरेकडे सरकण्याचे संकेत आहेत.

राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने तापामानाचा पारा ३० ते ३४ अंशांपर्यंत पोचला आहे. शनिवारी (ता. ७) जळगाव येथे सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली. तर सोलापूर, डहाणू, परभणी, नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी, नागपूरमध्ये तापमान ३३ अंशांपार गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.

राज्यात ८ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

अनेक ठिकाणी कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा वाढ झाली असून, उकाड्यातही वाढ झाली आहे. मॉन्सून सक्रीय नसल्याने राज्यात पावसाची उघडीप आणखी चार ते पाच दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *