पुणे : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात सर्वदूर पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (ता.२०) राज्यात सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बिहारमध्ये एक, विदर्भ आणि छत्तीसगड परिसरावर एक, तसेच पश्चिम राजस्थान एक अशा तीन ठिकाणी चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. राजस्थान आणि बिहारमध्ये असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पूर्व-पश्चिम पट्टा (ट्रफ) आहे.

झारखंडपासून गुजरातपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यातच अरबी समुद्रातही महाराष्ट्रापासून केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्ट्याची निर्मिती झाली आहे. या वातावरणीय स्थितीमुळे राज्यात सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

राज्यात २० ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

उद्या (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बहुतांशी ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, कोकणातील पालघर, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात २० ऑगस्ट रोजी जिल्हानिहाय पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

गुरूवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने पाण्याअभावी करपून चाललेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळणार आहे.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये :

कोकण :
मुंबई शहर : कुलाबा ५२, सांताक्रुझ ४२.
पालघर : डहाणू ४१, वसई ७५, विक्रमगड, वाडा,
रायगड : माथेरान ६३, मुरूड ४९, तळा ४०, उरण ६०.
रत्नागिरी : लांजा ४०.
सिंधुदुर्ग : दोडामार्ग ४७.
ठाणे : आंबरनाथ ४७, ठाणे ५५.

मध्य महाराष्ट्र :
नगर
: शिर्डी ४७.
धुळे : धुळे ६६, साक्री ४९, शिरपूर ५६.
जळगाव : चाळीसगाव ५६, एरंडोल ४३.
नाशिक : गिरणा धरण ६३, नांदगाव ५७, सुरगाणा ६३, येवला ५८.
सांगली : सांगली ५०.
सातारा : महाबळेश्वर ५२.

मराठवाडा :
औरंगाबाद : गंगापूर ४५, कन्नड ११५, खुल्ताबाद ४८, वैजापूर ६१.
बीड : केज ३८.
जालना : जालना ४२.
नांदेड : भोकर ५४, किनवट ६४, माहूर ६०.
उस्मानाबाद : भूम ४४, कळंब ३५, वाशी ४०.
परभणी : सेलू ४०.

विदर्भ :
अकोला : बाळापूर ४४, पातूर ७०,
अमरावती : अमरावती ५१, चांदूर रेल्वे ४१, धामणगाव रेल्वे ४४, तिवसा ७१, वरूड ४१.
भंडारा : साकोली ६०.
बुलडाणा : मेहकर ११३.
चंद्रपूर : चंद्रपूर ४३.
गडचिरोली : मुलचेरा ४४.
गोंदिया : अर्जुनी मोरगाव ४१, गोरेगाव ६०, सडकअर्जुनी ५१, तिरोडा ५६.
वर्धा : आष्टी ४८, देवळी ६६, हिंगणघाट ४४, खारंघा ४७.
वाशिम : करंजालाड ४६, मालेगाव ५४, मंगरूळपीर ६६.
यवतमाळ : दारव्हा ७७, दिग्रस ६१, कळंब ७५, महागाव ८६, नेर ५८, यवतमाळ ४१, झारीझामणी ६२.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *