पुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू असलेला पाऊस दोन दिवसांत पुन्हा उघडीप देण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्या (ता.१९) विदर्भ, कोकणात बहुतांशी ठिकाणी, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश लगतच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाब क्षेत्र विरून गेले आहे. झारखंड आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. विदर्भापासून तमिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

राज्यात १९ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

उद्या (ता. १९) उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, कोकणातील पालघर, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात १९ ऑगस्ट रोजी जिल्हानिहाय पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग)

बुधवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद झाली. यंदा पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडला. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कमी होता.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये :

मध्य महाराष्ट्र :
नगर : नगर ४८.
धुळे : धुळे ६०, गिधाडे ९१, शिरपूर ९४, सिंदखेडा ५८,
जळगाव : अंमळनेर ११०, भाडगाव ५८, भुसावळ ३७, बोधवड ३८, चाळीसगाव ६६, चोपडा ६६, दहीगाव ६१, धरणगाव ५४, एरंडोल ६९, जळगाव ४१, जामनेर ४२, पारोळा ७८, रावेर ४५, यावल ६०.
नंदूरबार : अक्कलकुवा ४८, अक्रणी ३२, नंदुरबार ६३, नवापूर ३०, शहादा ४४, तळोदा ४५.
नाशिक : गिरणा धरण ७३, नांदगाव ५३, सुरगाणा ४९, त्र्यंबकेश्वर ४८.

मराठवाडा :
औरंगाबाद : कन्नड ५६, खुल्ताबाद ५५, फुलंब्री ३१, सिल्लोड ४८, सोयगाव ५५.
बीड : माजलगाव ५५.
हिंगोली : औंढा नागनाथ ६३, हिंगोली ४०, कळमनुरी ३७, सेनगाव ३४, वसमत ४८.
जालना : बदनापूर ५०, भोकरदन ३८, घनसांगवी ११०, मंथा ६६, पातूर ५०.
लातूर : देवणी ४६.
नांदेड : अर्धापूर ५६, हादगाव ८५, माहूर ७०, नांदेड ४५.
परभणी : धालेगाव ३८, जिंतूर ३८, मानवत ८८, पालम १३७, पाथरी २९, सेलू ४२, सोनपेठ ३८.

विदर्भ :
अकोला : अकोला ३३, बार्शीटाकळी ३१, मर्तिजापूर ३५.
अमरावती : चांदूर रेल्वे ४८, धामणगाव रेल्वे ३२, मोर्शी ३५, नांदगाव काझी ४५,
भंडारा : भंडारा ५५.
बुलडाणा : देऊळगाव राजा ४९, लोणार ५५, मेहकर ४७.
गडचिरोली : चामोर्शी ५०.
नागपूर : हिंगणा ४०, मौदा ७०, पारशिवणी ५०, रामटेक ५०, सावनेर ६०.
वर्धा : देवळी ५०, वर्धा ४०.
यवतमाळ : उमरखेड ११०, अर्णी ५०, बाभुळगाव ६०, घाटंजी ५०, कळंब ७०, महागाव ८०, नेर ४०, पुसद ५०, यवतमाळ ७०.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
येथे क्लिक करा 👇🏻👇🏻 👇🏻
व्हाट्सॲप || टेलिग्राम || फेसबुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *