पुणे : दोन तीन दिवसांपासून राज्यात मॉन्सून सक्रीय झाल्याने अनेक ठिकाणी पावासाचा जोरदार हजेरी लावली आहे. उद्या (ता.१४) कोकणासह, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा मुसळधार पावसाचा इशारा वर्तविण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. सौराष्ट्र आणि अरबी समुद्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र व त्यापासून उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, बंगालच्या उपसागरापर्यंत आसलेल्या हवेचा कमी दाबाचा पट्ट्यामुळे (द्रोणीय स्थिती) राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.

उद्या (ता. १४) कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात अतिदक्षतेचा (रेड आलर्ट) इशारा आहे. तर सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, धुळे या जिल्ह्यात सतर्कतेचा (ऑरेंज आलर्ट) इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा (येलो अलर्ट) अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता.१४) राज्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

कोकणासह घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रायगडमधील तळा येथे २३९ मिलीमीटर, मुरूड येथे २०४ मिलीमीटर, रत्नागिरीतील मंडणगड येथे २३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग)

कोकण :
रायगड : कर्जत १२४, खालापूर १४५, माणगाव १९७, माथेरान १७५, म्हसळा १२३, मुरूड २०४, पेण १२४, पोलादपूर १६८, रोहा १५०, सुधागडपाली १५०, तळा २३९.
रत्नागिरी : चिपळूण १०४, दापोली १५८, गुहागर १२६, खेड १०४, लांजा १२०, मंडणगड २३२, राजापूर १४७, रत्नागिरी १८५, संगमेश्वर १३९, वाकवली १२५.
सिंधुदुर्ग : देवगड ११८, कणकवली १११, मालवण १३९, रामेश्वर १३१, सावंतवाडी ११३, वैभववाडी १२९, वेंगुर्ला १३३.

मध्य महाराष्ट्र :
कोल्हापूर : गगणबावडा १५३.
पुणे : लोणावळा १३३.
सातारा : महाबळेश्वर १२४.

मराठवाडा :
औरंगाबाद : कन्नड ७१, खुल्ताबाद ६०.
नांदेड : अर्धापूर ६०, मुखेड ९०.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *