मध्य महाराष्ट्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची मोठी ओढ

अमोल कुटे

पुणे : दक्षिण कोकणासह मराठवाड्यात दमदार बरसणाऱ्या मॉन्सूनच्या पावसाने मध्य महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगलीच ओढ दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील १३ तालुक्यात पावसाने दडी मारल्याने उन्हाळा मोडलाच नसल्याची स्थिती आहे. तर जुलै महिन्यात मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील बहुतांशी तालुक्यांत पावसाचे प्रमाण खुपच कमी असल्याचे चित्र आहे. जुलैमध्ये राज्यातील तब्बल ६७ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने चिंता वाढली आहे.

यंदा मॉन्सूनने राज्यात वेळेआधी दाखल होत, पाच दिवस आधीच राज्य व्यापले. यातच हवामान विभागाने मॉन्सून हंगामात महाराष्ट्रात दमदार पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र निम्मा २० जूननंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने ओढ दिल्याने पेरणी झालेल्या खरीपाच्या पिकांना फटका बसला आहे. यातच धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस न बरसल्याने चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. पावसाच्या उर्वरीत हंगामात चांगल्या पावसाची आवश्यकता आहे.

कृषी विभागाच्या ‘महावेध’ प्रकल्पातून मिळालेल्या माहितीनुसार १ जूनपासून पडलेल्या पावसाचा विचार करता नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच सहा तालुके, नाशिक जिल्ह्यातील पाच, कोल्हापूर व धुळे जिल्ह्यातील एका तालुक्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात तर सर्वांत कमी १९.५ टक्के पाऊस झालाय. पावसाने दिलेली ओढ पाहता या तालुक्यांमध्ये ‘उन्हाळा अद्यापही मोडलाच नाही’ असेच म्हणावे लागेल.

१ जून पासून राज्यात पडलेल्या पावसाची स्थिती दर्शविणारा नकाशा (सौजन्य : कृषी विभाग)

१ जूनपासून पडलेल्या पावसाची स्थिती, कंसात सरासरीच्या तुलनेत पडलेला पाऊस (टक्केवारी) :
नंदुरबार : नंदूरबार (३२.४), नवापूर (२८.३), शहादा (३३.२), तळोदा (२७.८), अक्रणी (४१.८), अक्कलकुवा (२९.५),
नाशिक : सुरगाना (१९.५), इगतपुरी (३२.१) , पेठ (३१.३), त्र्यंबकेश्वर (३६.६), नाशिक (४२.१),
धुळे : शिरपूर (३९.८)
कोल्हापूर : राधानगरी (४४.७)

जुलै महिन्यात २४ तालुक्यांत पावसाची दडी

जुलै महिन्यात दक्षिण कोकण, मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली तर विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाची ओढ कायम असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात राज्यातील २४ तालुक्यांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. ४३ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, ७१ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के, ५६ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के, तर १५९ तालुक्यांत १०० टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आहे.

जुलै महिन्यात राज्यात पडलेल्या पावसाची स्थिती दर्शविणारा नकाशा (सौजन्य : कृषी विभाग)

जुलै महिन्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस (सौजन्य : महावेध, कृषी विभाग) :

२५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेले तालुके :
ठाणे : मुरबाड, शहापूर.
पालघर : वाडा, विक्रमगड.
नाशिक : सुरगाणा, इगतपुरी, नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर.
नंदुरबार : नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा.
जळगाव : भूसावळ.
पुणे : पुणे शहर, हवेली, मुळशी, भोर, वेल्हे, राजगुरूनगर.
सातारा : जावळी मेढा, पाटण.
कोल्हापूर : राधानगरी.
नागपूर : पारशिवनी.

२५ ते ५० टक्के पाऊस पडलेले तालुके :
ठाणे : कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ.
पालघर : जव्हार, मोखाडा,
रायगड : कर्जत, खालापूर, सुधागड.
नाशिक : दिंडोरी.
धुळे : शिरपूर.
नंदुरबार : शहादा, अक्रणी.
जळगाव : जळगाव, यावल, चोपडा, बोधवड.
पुणे : मावळ, जुन्नर, आंबेगाव.
सातारा : सातारा, कराड, खटाव, महाबळेश्वर.
सांगली : शिराळा, कडेगाव.
कोल्हापूर : पन्हाळा, शाहुवाडी, करवीर, चंदगड.
अमरावती : अमरावती, मोर्शी, धामणगाव रेल्वे.
वर्धा : आष्टी.
नागपूर : रामटेक, काटोल, नरखेड.
गोंदिया : आमगाव, सडक अर्जुनी.
चंद्रपूर : गोंडपिपरी.
गडचिरोली : अहेरी, धानोरा.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: