पुणे : कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढू लागला आहे. उद्या (ता. २०) मुंबईसह कोकणात सर्वदूर तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचे पश्चिमकडील भाग त्याच्या नियमित स्थितीवर असून तो उत्तरेकडे सरकणार आहे. तर पुर्वभाग काहीसा उत्तरेकडे असून, दोन दिवसांत तो दक्षिणेकडे येणार आहे. यातच बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. २३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रीय असून, तो पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पाऊस पडण्यात अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मंगळवारी (ता.२०) राज्यात पडणाऱ्या पावसाचा अंदाज (सौजन्य : हवामान विभाग)

कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाल सुरूवात झाली आहे. आतापर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी असलेल्या उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह, पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडला आहे.

सोमवारी (ता १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिकमधील ओझरखेडा येथे सर्वाधिक ३३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिकमधील इगतपूरीसह पालघर जिल्ह्यातील मोखाडा, विक्रमगड, रायगडमधील, माणगाव, माथेरान, मुरूड, पनवेल, रोहा, तळा, रत्नागिरीतील दापोली, लांजा, सिंधुदुर्गमधील देवगड, कनकवली, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, ठाणे, उल्हासनगर येथे २०० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्यात पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :
कोकण :
पालघर : जव्हार १९२, मोखाडा २११, विक्रमगड २१५, वाडा १०९,
रायगड : अलिबाग १५८, कर्जत १९४, खालापूर १९५, माणगाव २०७, माथेरान २६८, म्हसळा १५९, मुरूड २७०, पनवेल २८४, पेण १८०, पोलादपूर १२२, रोहा २०२, श्रीवर्धन १६३, सुधागडपाली १६६, तळा २१०, उरण १५१.
रत्नागिरी : दापोली २४३, गुहागर १६७, हर्णे १९०, खेड १४२, लांजा २०५, राजापूर ११८, रत्नागिरी १५२, वाकवली १५४.
सिंधुदुर्ग : देवगड २००, दोडामार्ग ११९, कणकवली २४०, कुडाळ १४४, मालवण १९०, मुलदे (कृषी) १२४, सावंतवाडी १३०, वैभववाडी १७०, वेंगुर्ला १४६.
ठाणे : आंबरनाथ १५४, भिवंडी १५५, कल्याण १८०, शहापूर २००, ठाणे २१०, उल्हासनगर २००.

मध्य महाराष्ट्र :
नगर : अकोले ८६.
कोल्हापूर : गगणबावडा १७९, राधानगरी ७२,
नाशिक : हर्सूल १२६, इगतपुरी २२२, ओझरखेडा ३३०, पेठ १४३, सुरगाणा ११७.
पुणे : लोणावळा कृषी १६७.
सातारा : महाबळेश्वर ९८.

मराठवाडा :
जालना : घनसांगवी ७३.

हवामान विषयक अपडेट आणि बातम्यांसाठी महावृत्तच्या फेसबुक पेजला लाईक करा.
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *