पुणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ५० % अनुदानावर मावळ तालुक्यातील मानाजी बबन खांदवे या शेतकऱ्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बैलजोडीचे वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभ योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या योजनेचा शुभारंभ विधानभवन येथे झाला. कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी-डॉ राजेश देशमुख,विभागीय आयुक्त-सौरभ राव, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुनील शेळके, अशोक पवार, अतुल बेनके, सुनील टिंगरे उपस्थित होते.

पाच एकरच्या आत जमीन असणाऱ्या, ट्रॅक्टर उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत पात्र धरण्यात आलेले आहेत. तसेच अर्थिक दृष्टीने कमकुवत व अल्पभूधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देणार आहे, अशी माहिती सभापती बाबुराव वायकर यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *