जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. देशाच्या संपुर्ण वायव्य भागासह उत्तर भारतातील बहुतांशी भागातून मॉन्सून परतला आहे. यातच बंगालच्या उपसागरात उद्या (ता.९) हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे. परिणामी उद्यापासून विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रात उद्या (ता.९) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. रविवारपर्यंत (ता.११) दुपारी ते सायंकाळपर्यंत ही प्रणाली उत्तर आंध्रप्रदेश ते दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीलगत जमिनीवर येणार आहे. सोमवारपर्यंत (ता. १२)आंध्र प्रदेशची किनारपट्टी, ओडिशात मुसळधार तर तेलंगणा, रायलसीमा, उत्तर कर्नाटकमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात उद्यापासून पावसाची शक्यता असून, सोमवारपर्यंत च्या विविध भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सोमवारपर्यंत विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

वादळी पावसाची शक्यता असलेले जिल्हे (स्त्रोत : हवामान विभाग)

शुक्रवार (ता. ९) :
सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, परभणी, हिंगाली, नांदेड, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

शनिवार (ता. १०) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगाली, नांदेड, अकोला, वाशीम, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

रविवार (ता. ११) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगाली, नांदेड, अकोला, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

सोमवार (ता. १२) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगाली, नांदेड, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *