राजेश डवरे

हरभरा

  • हरभरा पीकात पेरणीपुर्वी मर रोगाच्या प्रतिबंधाकरीता नविनतम शिफारसित मर रोग प्रतिबंधक वाणाचा (उदा. पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रम) पेरणीसाठी वापर करावा.
  • पेरणीपुर्वी हरभरा पीकात मर व मुळकुजव्या रोगाच्या प्रतिबंधाकरीता ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी किंवा द्रवरूप ट्रायकोडर्मा उपलब्ध असल्यास ५ ते ६ मिली द्रवरूप ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
  • हरभरा पीकात मर व मुळकुजव्या रोगाच्या प्रतिबंधाकरीता पेरणीपुर्वी एकरी २ ते ४ किलो ट्रायकोडर्मा पुरेशा शेण खतात मिश्रण करून जमिनीत ओल असतांना जमिनीत टाकुन वखराची पाळी देवुन चांगली जमिनीत मिसळुन घ्यावी.
  • हरभरा पीकात बऱ्याच वेळा बियाण्याची उगवण झाल्यावर रोपे जमिनीलगत कापुन पडल्याप्रमाणे दिसुन येतात. या प्रार्दुभावाचे मुख्य कारण म्हणजे मोनोसेफॅलम भुंगेरे होय. या किडीच्या प्रतिबंधाकरीता पुर्व पिकाचे अवशेष किंवा सेंद्रीय पध्दतीचे ढिग शेतात लावुन ठेवु नयेत. हंगामापुर्वी त्याची विल्हेवाट लावावी. गवत व इतर वनस्पतीचा वेळेस बंदोबस्त करावा.
  • शिफारसीप्रमाणे पेरणीची वेळ, योग्य शिफारसीत बियाण्याचा दर व अंतर राखणे, शिफारसीप्रमाणे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन पध्दतीचा अंगिकार करून हरभरा पीकात अन्नद्रव्याचे किंवा खताचे व्यवस्थापन करणे व अतिरिक्त नत्रयुक्त खताचा वापर टाळणे.
  • मिश्रपीक पध्दतीमध्ये हरभरा घेणे हेक्टरी २० पक्षी थांबे लावणे किंवा ज्वारीचे २०० ग्रॅम बियाणे प्रति हेक्टरी मिसळुन नैसर्गिक पक्षी थांब्याचा लाभ घेणे तसेच हेक्टरी ५ ते ६ कामगंध सापळे हेलील्युर या कामगंध गोळीसह पीकाच्यापेक्षा १ फुट उंचीवर लावणे.
  • कामगंध सापळयात ८ ते १० घाटेअळीचे नर पतंग सतत २ ते ३ दिवस अडकल्यास घाटेअळीची व्यवस्थापन करणे तसेच वेळोवेळी ५ टक्के निंबोळी अर्काचा वापर करणे व गरजेवर आधारीत आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेवुन गरजेनुसार लेबलक्लेम शिफारसीप्रमाणे किटकनाशकाचा वापर तज्ञांच्या सल्ल्यानुसार केल्यास हरभरा पीकात घाटेअळीचा प्रतिबंध व प्रभावी व्यवस्थापन होवु शकते.

गहु

  • गहु पीकात काजळी किंवा कानी या रोगाच्या प्रतिबंधाकरीता कार्बोक्झीन ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के डि.एस. या संयुक्त बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
  • गहु पिकात तांबेरा रोगाच्या प्रतिबंधाकरीता एकेडब्ल्यु ४६२७, पीडीकेव्ही सरदार (एकेडब्ल्यु ४२१०-६), एकेडब्ल्यु ३७२२, या सारख्या तांबेरा प्रतिबंधक वाणाचा पेरणीसाठी वापर करावा.
  • गहु पीकात खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पीकांची फेरपालट करावी, गहु पीकाची पेरणी शिफारसीत वेळेनुसार करावी, गहु पीकास रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. पीकाच्या वाढीच्या अवस्थामध्ये पाण्याचा ताण पडु देवु नये.
  • गहु पीकात उंदीराच्या प्रतिबंध व्यवस्थापनासाठी धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व एक भाग ब्रोमोडीऑलॉन ०.२५ टक्के सिबी एकत्र मिसळुन आमिष तयार करावे व हे चमचाभर आमीष प्लॅस्टीकच्या पीशवित टाकुन शेतातील उंदरांच्या बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे.

करडी

  • करडी पीकात मावा किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबरच्या शेवटच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात पेरलेल्या पीकावर कमी राहुन उत्पन चांगले मिळते त्यामुळे करडीची पेरणी शक्यतो सप्टेंबरच्या चौथ्या ते ऑक्टोबर पहिल्या आठवडयात करावी. यापेक्षा उशीर झाल्यास ऑक्टोबर अखेरपर्यंत पेरणी उरकावी.
  • करडी पीकात मर रोगाच्या प्रतिबंधाकरीता ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बिजप्रक्रीया करावी किंवा द्रवरूप टायकोडर्मा उपलब्ध असल्यास ६ ते ८ मिली द्रवरूप टायकोडर्मा प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
  • करडी पीकात मर रोगाच्या प्रतिबंधासाठी पेरणीपुर्वी एकरी २ ते ४ किलो ट्रायकोडर्मा पुरेशा शेणखतात मिश्रण करून जमिनीत ओल असतांना जमिनीत टाकुन वखराची पाळी देवुन चांगली जमिनीत मिसळुन घ्यावी.

रब्बी ज्वारी

  • रब्बी ज्वारीच्या पीकात खोडमाशीच्या प्रतिबंधाकरीता शिफारसीत वेळेवर म्हणजे साधारणत: २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान पेरणी संपवावी. यापेक्षा उशीर झाल्यास ऑक्टोबर अखेरपर्यंत पेरणी करावी. आणि पेरणीपुर्वी खोडमाशीच्या प्रतिबंधाकरीता इमिडाक्लोप्रीड ४८ टक्के १२ मिली प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर १५ दिवसांनी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली अधिक १० लिटर पाणी या प्रमाणात घेवुन फवारणी करावी.
  • दाणेदार बुरशी या रोगाच्या प्रतिबंधाकरीता थायरम ७५ टक्के डब्ल्यएस ३ ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात बिजप्रक्रीया करावी.
  • ज्वारीवरील खडखडया या रोगाच्या प्रतिबंधाकरीता पीकाची फेरपालट करावी, जमिनीत पालाश कमी असल्यास त्याची योग्य मात्रा खताद्वारे दयावी, पेरणी शिफारस केलेल्या वेळी करावी. ज्वारीचे आंतरपीक किंवा मिश्रपीक घ्यावे.

रब्बी भुईमुग

  • रबी भुईमुग या पीकात खोडकुज व मुळकुज या रोगाच्या प्रतिबंधाकरीता या रोगाच्या प्रतिबंधाकरीता कार्बोक्झीन ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के डि.एस. या संयुक्त बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

जवस

  • जवस पीकात गांधमाशी या किडीच्या प्रतिबंधाकरीता जवस पीकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात पुर्ण करणे अपेक्षित आहे. किंवा ऑक्टोबर अखेरपर्यंत लवकरात लवकर पेरणी करावी.
  • जवस अधिक हरभरा ४:२ या आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास गांधमाशीचा प्रादुर्भाव कमी येतो.
  • जवस पीकात अल्टरनेरिया ब्लाईट या रोगाच्या प्रतिबंधासाठी कार्बेन्डायझीन ३ ग्रॅम प्रतिकिलो बियास या प्रमाणात पेरणीपुर्वी प्रतिक्रिया करावी.
  • जवस पीका मर रोगाच्या प्रतिबंधाकरीता ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

लेखक : राजेश डवरे हे कृषी विज्ञान केंद्र, करडा, जि. वाशिम येशे कीटक शास्त्रज्ञ आहेत. मो. ९४२३१३३७३८.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *