उंबर

शास्त्रीय नाव : Ficus racemosa
उपयुक्त भाग : फळे, साल, मुळ, पाने
कालावधी : पावसाळा, उन्हाळा

औषधी गुणधर्म

  • या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात.
  • गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते.
  • या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो.
  • गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.

उंबराची भाजी

साहित्य
उंबराची कच्ची फळे, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर.

कृती

  • एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व उंबरे उकळुन घ्यावे.
  • नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.
  • उकळलेल्या उंबराचे तुकडे करुन काप करावे.
  • नंतर एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो तळून घ्यावे.
  • नंतर त्यामध्ये मध्यम आचेवर शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे.
  • अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *