मायाळू

शास्त्रीय नाव : Basella alba
इंग्रजी नाव : malbar night shade indian spinach
कुळ : basellaceae
आढळ : मायाळू या बहुवर्षिय वेलाची बागेत, अंगणात, परसात, तसेच कुंडीत सर्वत्र लागवड करतात.

औषधी गुणधर्म

  • मायाळू ही औषधी वनस्पती असून ती शीतल व स्नेहन आहे.
  • ही वनस्पती तुरट, गोडसर, स्निग्ध, निद्राकार, चरबीकारक, विरेचक भूकवर्धक आहे.
  • मायाळू कफकारक , मादक व पौष्टिक आहे.

मायाळूची भाजी

साहित्य
मायाळूची पाने, एक वाटी शिजवलेली तूरडाळ, एक वाटी चिरलेला कांदा, एक वाटी ओले खोबरे, धने, मीठ, हळद, चार सुक्या मिरच्या, गूळ, चिंच, तेल इ.

कृती

  • मायाळूची पाने धुवून चिरून घ्यावीत.
  • मायाळूची चिरलेली पाने, अर्धी वाटी कांदा व पाणी घालून शिजवून घ्यावी.
  • शिजवलेली तूरडाळ घालावी. धने, मिरची व खोबरे वाटून घ्यावे.
  • वाटण, हळद, मीठ, गूळ व थोडी चिंच असे मिश्रण उकळून घ्यावे व शिजवलेल्या भाजीत घालावे.
  • वरून कांदा घातलेली फोडणी द्यावी.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *