केळफुल

शास्त्रीय नाव : मुसा पॅराडिसीआका (Musa Paradisiaca)
कुळ : मुसासी (Musaceae)
इंग्रजी नावे : बनाना फ्लॉवर, बनाना ब्लॉसम (Banana flowers, Banana blossoms)

औषधी गुणधर्म

  • केळफुल मधुमेह नियंत्रित करण्यासाठी गुणकारी आहे.
  • कर्करोग आणि हृदयरोगाचा प्रतिबंध करते.
  • स्तनपान सुधारित करते.
  • मूत्रपिंडाच्या कार्यास प्रोत्साहन देते.
  • मासिक पाळीसंदर्भात निरोगीपणा राखण्यास मदत करते.

केळफुलाची भाजी

साहित्य
केळफुल, कांदा, मीठ, मिरची, तेल

कृती

  • कोवळी केळफुल सोलून घ्यावी.
  • मधला तुरा काढून टाकावा (तुरा काढला नाही तर भाजी कडू होते).
  • नंतर पाण्यात भिजवून धुवावे.
  • कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्यावा.
  • कांदा भरपूर घालावा, जेवढे फुलं तेवढा कांदा घालावा.
  • कांदा परतल्यावर त्यात केळ फुले, मीठ, मिरची पावडर, जिरे घालावे.
  • मंद आचेवर थोड्यावेळ परतावे.

सौजन्य : अनिता दुरगुडे, राहरी, जि. नगर. (मो.९६५७६१४०६४)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *