आघाडा

शास्त्रीय नाव : Achyarnthes aspera
उपयुक्त भाग : कोवळी पाने, बिया

औषधी गुणधर्म

  • मस्तकरोग, रातांधळेपणा, कावीळ, खोकला, इत्यादी रोगांवर गुणकारी आहे.
  • दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना लावावा
  • पोटदुखीवर आघाड्याची चार-पाच पाने चावून खातात किंवा पानांचा रस काढून पितात.
  • पित्त झाल्यास आघाड्याचे बी रात्री ताकात भिजत घालून सकाळी ते वाटून रुग्णाला दिल्यास पित्त बाहेर पडते किंवा शमते. त्यानंतर तूपभात खाणे श्रेयस्कर असते.
  • खोकला व कफ खूप झाला असेल, कफ बाहेर पडत नसेल, तोंडात चिकटून राहत असेल तर आघाड्याची झाडे मुळासकट उपटून ती जाळून त्याची केलेली राख थोडी मधात घालून त्याचे चाटण रुग्णाला देतात. त्यामुळे कफ पातळ होऊन तो बाहेर पडतो व खोकलाही कमी होतो.
  • आघाडयात हाडे मजबूत करायचे गुण आहेत. खेरीज मधुमेहिंसाठीही तो उपयुक्त आहे. त्यात झिंक,तांबे, कॅल्शिअम भरपूर असते. आघाडयाची राख विषमज्वरावरील औषधात वापरतात. हि राख मूत्रविकार, त्वचाविकार व कफविकारांवर उत्तम असते.

आघाड्याची भाजी

साहित्य
आघाची कोवळी पाने, लसुण, कांदा, डाळीचे पीठ, तेल, तिखट, मीठ, फोडणीचे साहित्य इ.

कृती

  • आघाड्याची पाने धुवून, चिरुन घ्यावीत.
  • कढईत तेल घेऊन त्यात फोडणी करुन घ्यावी.
  • लसणाच्या पाकळ्या घालाव्यात. नंतर चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालुन चांगली वाफ येऊ द्यावी.
  • भाजी अर्धवट शिजल्यावर डाळीचे पीठ हळुहळु भुरभुरत टाकावे.
  • सतत भाजी हलवावी. एकसारखे हलवत राहिल्याने भाजी मोकळी होईल. भाजी मंद गॅसवर शिजवून घ्यावी.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *