zilla parishad

समाज कल्याणच्या सभापती सरिका पानसरे यांची माहिती

पुणे : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातील बारावी पास विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजना सुरु केली आहे. यामध्ये निवड केलेल्या विद्यार्थ्यांची सोमवारी (दि.७) ऑनलाईन मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती समाज कल्याणच्या सभापती सरिका पानसरे यांनी दिली.

कामावर आधारित पदवी हा सरकारी प्रशासनासोबतचा संपूर्ण देशातील पहिलाच प्रयोग आहे. समाजकल्याण आयुक्तांनी नुकतीच त्याला मान्यता दिली आहे. समाजकल्याण विभागाकडून ७ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले होते. त्यातील ७७ अर्ज पात्र ठरले. १३ जुलै रोजी ही पात्रता परीक्षा होणार होती. परंतु लॉकडाऊनमुळे २ ऑगस्ट रोजी परिक्षा घेण्यात आली. ७७ अर्जदारांपैकी केवळ ४८ जण परिक्षेत उत्तीर्ण झाले.

मुलाखतीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखती ऑनलाईन पद्धतीने जिल्हा परिषदेतून घेतल्या जाणार आहेत. उमेदवाराला दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी हजर असणे आवश्यक आहे. सदर दिवशी आणि सदर वेळेत अनुपस्थित राहणार्‍या उमेदवारांचा निवड प्रक्रियेकरिता विचार केला जाणार नसल्याचे सभापती पानसरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *