मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद अध्यक्ष

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. विभागातील सर्वच जिल्ह्यांतील शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांसाठी मागणी व आवश्यकतेनुसार पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विभागीय ऑक्सिजन पुरवठा व संनियंत्रण समिती तयार करण्यात आली आहे. त्याचे अध्यक्ष पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद असणार आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून याबाबत आदेश काढण्यात आला आहे. समितीला विभागात ज्या उत्पादक कंपन्या आहेत. त्या कंपन्या, वितरण प्रणाली, संबंधित यंत्रणाचे संनियंत्रण करण्याचे काम करावे लागणार आहे. विभागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रुग्णांना ऑक्सिजनची आवश्कयता पडत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. ऑक्सिजनची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाऊ शकते किंवा त्याचे नियोजन व्यवस्थित न केल्यास भविष्यात मागणी वाढल्यानंतर रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये. यासाठी प्रशासनाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यामुळे या सर्व घडामोडींवर या समितीचे लक्ष असणार असून, योग्य पद्धतीने ऑक्सिजनचे वितरण होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *