अजित पवार यांचे नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन

पुणे : सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास, रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत साडेसात कोटी रुपयांचा दंड वसूल झाला आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही ही दुर्दैवी बाब आहे. कोरोनावर नियंत्रण आणायचे असेल तर नियमांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.


चौदाव्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायतींना मिळालेल्या निधीमधून जिल्हा परिषदेच्या ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. त्याचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती प्रमोद काकडे, बाबुराव वायकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. पुणे जिल्हा परिषदेने अनेक संकट काळात पुढाकार घेऊन नागरिकांना मदत करण्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत. नागरिकांना तातडीने आरोग्य सुविधा मिळव्या या हेतुने ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन चौदाव्या वित्त आयोगातून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. रुग्णवाहिकामुळे पुढील काळात तातडीने नागरिकांना उपचार मिळतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *