कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या

पुणे : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्रातही संसर्ग वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यास आणखी कालावधी लागणार असल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने जगभर पसरलेल्या कोरोना विषाणू (कोव्हीड- १९) आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती विचारात घेता, विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका १८ मार्च व १७ जून आदेश काढून पुढे ढकलल्या होत्या. तर राज्यात टाळेबंदीचा कालावधीही ३० सप्टेंबर वाढविण्यात आल्याने अद्याप सहकारी संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.

अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. त्याचप्रमाणे, रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे उचित होणार नाही. या निवडणूका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याच्या दृष्टीकोनातून सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ढकल्याचा आद्यादेश राज्य शासनाने सोमवारी काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *