टाकळा

शास्त्रीय नाव : Cassia Tora
इंग्रजी नाव : Foetid Cassia
स्थानिक नाव : तरोटा, तरवटा
कूळ : Caesalpinaceae
आढळ : टाकळा हे तण पडीक ओसाड सर्वत्र वाढलेले असते. टाकळा ही वनस्पती उष्ण कटिबंधातील सर्व देशांत आढळते.

औषधी गुणधर्म

  • टाकळ्याच्या पानांत विरेचन द्रव्य व लाल रंग असतो.
  • टाकळा सर्व प्रकारच्या त्वचा रोगात देतात.
  • बिया लिंबाच्या रसातून वापरण्याचा प्रघात आहे.
  • पानांचा काढा दातांच्या वेळी मुलांना येणाऱ्या तापावर निर्देशित करतात.
  • पित्तज, हृदयविकार, श्वास, खोकला यात पानांचा रस मधातून देतात.
  • त्वचा जाड झालेली असल्यास याचा विशेष उपयोग करतात.
  • पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत
    होते.

टाकळ्याची भाजी

साहित्य
तरोटा/टाकळयाची भाजी, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर

कृती

  • एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व खुडलेली भाजी उकळुन घ्यावे. त्यातील पाणी नितळुन घ्यावे.
  • एक पातेल्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो तळून घ्यावे.
  • त्यामध्ये भाजी टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे.
  • अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजी तयार होईल.
  • मेथीच्या भाजीसारखीच टाकळ्याची भाजी करतात किंवा आपल्या आवडीनुसार भाजी बनवू शकता.
  • ही औषधी तणभाजी असल्याने त्यात साधे मसाले (हिरवी, मिरची, तेल, मिठ) घालुन भाजी बनवावी.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *