Schofield barracks (job 998)

पिंपळ

शास्त्रीय नाव : Ficus religiosa
इंग्रजी नाव : Piple
स्थानिक नाव : अश्वत्थ , पिप्पल बोधिम
कुळ : Moraceae
आढळ : हे वृक्ष मध्य भारत, पश्चिम बंगाल व हिमालयाच्या पायथ्याशी आढळतात.

औषधी गुणधर्म

  • पिंपळाची साल, सालीची राख, कोवळी व सुकी पाने, फळे व बिया औषधात वापरतात.
  • पिंपळाची साल रक्तसंग्राही व पौष्टिक आहे.
  • फळे पाच व रक्तशुध्दी करणारी आहेत.
  • पिकलेले पान विडयाच्या पानांतुन काविळीत देतात.
  • मुळाची साल मधात घासून मुलांच्या मुखरोगात व्रणावर लावतात.
  • पित्तकोपातही पिंपळ उपयुक्त आहे.
  • कोवळी अंतर्साल अस्थिभंगावर उपयोगी आहे.

पिंपळाच्या पानांची भाजी

साहित्य
दोन वाट्या पिंपळाची देठासहीत कोवळी पाने, थोडी चिंच, चार लसूण पाकळ्या, चार हिरव्या मिरच्या, तेल, मीठ इ.

कृती

  • पाने धुऊन, चिरुन घ्यावीत.
  • लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. हिरव्या मिरच्या चिरुन घ्याव्यात.
  • चिरलेली पाने वाफवून घ्यावीत. पाणी टाकून द्यावे.
    तेलात ठेचलेली लसून व चिरलेली हिरवी मिरची टाकावी.
  • नंतर वाफवलेली भाजी घालावी. चिंच घालावी.
  • चवी पुरते मीठ घालुन भाजी शिजवून घ्यावी.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *