कुडा

शास्त्रीय नाव : Holarrhena pubescens
इंग्रजी नाव : Konesi Bark Tree
स्थानिक नाव : पांढरा कुडा
कुळ : Apocynaceae
आढळ : ही वनस्पती महाराष्ट्रात बहुतेक सर्व ठिकाणी पर्णझडी जंगलात आढळतात.

औषधी गुणधर्म :

  • पांढरा कुडा ही महत्वाची औषधी वनस्पती असून, औषधात मुळाची साल व बिया वापरतात.
  • कुष्ठरोग, त्वचारोग यात गुणकारी आहे. धावरे, रक्तस्त्रावयुक्त मुळव्याध, थकवा यामध्ये कुडयाच्या बिया उपयुक्त आहेत.
  • बियांचे चुर्ण चिमूटभर रोज खाल्यास अन्न जिरते, पोटात वायु धरत नाही.
  • अतिसार, ताप, कावीळ, कुष्ठरोग, कफ, त्वचाविकार, पित्तकोष यात साल गुणकारी आहे.
  • पाने स्तंभक, दुग्धवर्धक व शक्तिवर्धक असून स्नायुंचे दुखणे कमी होतात.

कुडाच्या फुलांची भाजी

साहित्य
कुडा फुले, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरे, तिखट, मीठ, हळद, टोमॅटो, कोथींबीर

कृती
• एक पातेले घेउन त्यात एक ग्लास पाणी व कुडाची फुले उकळुन घ्यावे.
• नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.
• एका पातेल्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, जिरे, तिखट, मीठ, हळद तळून घ्यावे.
• नंतर त्यामध्ये उकळलेले कुडाची फुले टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे.
• अशा प्रकारे आपल्या आवडीची कुडाच्या फुलांची भाजी तयार होईल.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *