पानांचा ओवा

शास्त्रीय नाव : Plectranthus amboinicus
इंग्रजी नाव : Aromatic Coleus
आढळ : वनस्पतीचे नाव पानांचा ओवा असे आहे कारण पानांचा ओव्यासारखा वास येतो. वनस्पतीची लागवड बागेत करतात.

पानाच्या ओव्याची भाजी

साहित्य :
पानाचा ओवा पाने, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद,
टमाटर, कोथींबीर

कृती :

  • एक पातेले घेऊन त्यात एक ग्लास पाणी व खुडलेली भाजी उकळुन घ्यावी.
  • नंतर त्यातील पाणी नितळुन घ्यावे.
  • नंतर एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला
    कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मीठ, हळद, टमाटर तळून घ्यावे.
  • नंतर त्यामध्ये भाजी टाकुन शिजु द्यावे. नंतर कोथींबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची भाजीतयार होईल.

औषधी गुणधर्म

  • पानांचा औषधात वापर करतात पेयजलांना सुवासिक वास येण्यासाठी पानांचा उपयोग करतात.
  • गुरांसाठी औषध म्हणून वापरतात.
  • पोटदुखी, अपचन, कुपचन, पोटशुळ यामध्ये एखादे पान दिल्यास गुण येतो.
  • नेत्राभिष्यन्दात पापण्यावर पानांचा रस लावतात किटकदंशावर गुणकारी दमा, जुनाट खोकला, फेपरे इ. संकोचप्रधान रोगात उपयोगी.

सौजन्य : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *