शेवगा

शास्त्रीय नाव : Moringa oleifera
कुळ : मारिंगेएसी
उपयुक्त भाग : पाने, शेंगा, फुले, मूळ.
कालावधी : वार्षिक (वृक्ष) बहार – जानेवारी ते एप्रिल

औषधी गुणधर्म

  • यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शियम, संत्र्याच्या सहापट क जीवनसत्व व केळयाच्या तीनपट पोटॅशियम तसेच लोह व प्रथिनेही असतात.
  • यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असून असून मधुमेह व उच्च रक्त दाबावर उपयुक्त.
  • मूळाच्या सालीचा रस कानदुखीत वापरतात. पानांच्या भाजीमुळे सूज, जंत, गळू हे आजार बरे होतात. कृमिनाशक म्हणून उपयुक्त.
  • शारीरिक व मानसिक थकवा, जडपणा या भाजीने कमी होतो.

शेवगा पराठा

साहित्य
शेवग्याची कोवळी पाने साधारण दहा, तांदळाचे पीठ चार कप, तिखट, मीठ, हळद.

कृती

  • शेवग्याची पाने कोवळी घ्यावे, नंतर त्यात ४ कप तांदळाचे पीठ घ्यावे.
  • त्यात अर्धा ग्लास पाणी मिसळून ते पीठ मळून घ्यावे व त्यात तिखट, मीठ, व हळद मिसळून घ्यावे.
  • नंतर त्याचे पराठ्याची आकारानुसार जाड पोळी तयार करून तव्यावर पूर्ण शिजेपर्यंत काळपट होईपर्यंत शिजवून घ्यावे.
  • अशा प्रकारे सुंदर चविष्ट पराठे तयार करावेत.

शेवगा भाजी

साहित्य
अर्धा किलो शेवगा शेंगा, चिरलेला बारीक कांदा, लसुण पाकळ्या, वाटलेला मटन मसाला, हळद, मीठ, गोडा मसाला, तेल, टोमॅटो

कृती

  • प्रथम शेवग्याच्या शेंगाचे टरफल शिलुन घ्यावे व आतील कोवळा भाग काढुन घ्यावा व त्याचे दोन इंच आकाराचे तुकडे करावे.
  • गॅसवर एका पातेल्यात तेलात कांदा व लसुण टाकावे.
  • वाटलेला मटन मसाला, हळद, मीठ, गोडा मसाला, टोमॅटो, टाकून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावे.
  • नंतर त्यात कापलेला शेंगा टाकुन शिजेपर्यंत ढवळत राहावे साधारण २० ते २५ मिनिटे नंतर भाजी बघावी.
  • शेंगा हाताने दाबल्यास मऊ लागतात. अशाप्रकारे स्वादिष्ट व रुचकर शेवगा शेंगा भाजी बनवावी.

स्त्रोत : रानभाज्यांची माहिती पुस्तिका, कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *